अफुच्या शेतीवर कारवाई करत एकूण २७ लाख ५६ हजार ४६० रूपये किंमतीची सुमारे ८८३ किलो ग्रॅम वजनाची बोंडासह अफुची झाडे हस्तगत...
इंदापूर:- न्हावी गावाचे शिवारात शेती मालात अंमली पदार्थाच्या निर्मितीसाठी बेकायदेशीर विनापरवाना लागवड करण्यात आलेल्या अफुच्या शेतीवर कारवाई करत एकूण २७ लाख ५६ हजार ४६० रूपये किंमतीची सुमारे ८८३ किलो ग्रॅम वजनाची बोंडासह अफुची झाडे हस्तगत करून तीन इसमांना ताब्यात घेण्यात आले.स्थानिक गुन्हे शाखा व वालचंदनगर पो.स्टे. पुणे ग्रामीणची कारवाई अंमली पदार्थ वनस्पतींची बेकायदेशीर विनापरवाना लागवड करून उत्पादन घेवून विक्री केल्यामुळे कमी कालावधीत
झटपट पैसा कमविता येतो अशी धारणा लोकांमध्ये तयार झाली आहे. यातूनच कायद्याचा भंग करून काही लोक शेतीचे नावाखाली शेती मालात अफु, गांजा सारख्या अंमली पदार्थ निर्मिती करणाऱ्या वनस्पतींची बेकायदेशीरपणे विनारपरवाना लागवड करून उत्पादन घेत आहेत.पुणे ग्रामीण जिल्हयाचे पोलीस अधीक्षक, श्री पंकज देशमुख साहेब यांनी अंमली पदार्थांचे उत्पादन, साठा, विक्री, सेवन करणारे इसमांवर कारवाई करण्याचे आदेश पुणे ग्रामीण पोलीसांना करून यामध्ये महत्त्वाची भुमिका बजाविणेबाबत स्थानिक गुन्हे शाखेस आदेशीत केले होते.
स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अविनाश शिळीमकर यांनी त्यांचे अधिनस्त पथकांना त्या अनुषंगाने गोपनीय माहिती काढून कायदेशीर कारवाई करणेकरीता मागदर्शन करून आदेश दिले होते. त्यानुसार बारामती उपविभागात गुन्हे
प्रकटीकरणाचे काम पाहणारे स्था. गु. शा. चे पथक वालचंदनगर पोलीस स्टेशन हद्दीत अवैध व्यवसायांवर कारवाई करणेच्या उद्देशाने पेट्रोलिंग करत असताना दि. २१/०२ / २०२५ रोजी स्था. गु.शा. चे पथकातील पोलीस हवालदार स्वप्निल अहीवळे यांना गोपनीय बातमीदारामार्फत बातमी मिळाली की, मौजे न्हावी ता. इंदापूर जि. पुणे गावचे हद्दीत रतन कुंडलिक मारकड व बाळु
बाबुराव जाधव यांनी त्यांचे मालकीचे शेतात बेकायदेशीरपणे विनापरवाना अफुच्या झाडांची लागवड विक्री करणेच्या उद्देशाने करून उत्पादन घेतले आहे, अशी बातमी मिळाली. सदर बातमीचा आशय पो. नि. अविनाश शिळीमकर यांनी मा. पोलीस अधीक्षक साो पुणे ग्रामीण यांना सांगितला त्यांचेकडून कारवाईचे आदेश प्राप्त करून स्थानिक गुन्हे शाखा, वालचंदनगर पो स्टे
कडील पोलीस अधिकारी व अंमलदार यांचे मदतीने उपविभागीय पोलीस अधिकारी बारामती उपविभाग यांचे परवानगी व आदेशान्वये राजपत्रीत अधिकरी, पंच तसेच महसुल विभाग, कृषी विभागाचे अधिकारी यांचेसह मौजे न्हावी गावात जावून मिळालेल्या बातमीचे आधारे नमुद संशईत इसमांचे शेतात जावून पाहणी करून कारवाई केली असता, शेतामध्ये उपस्थित इसम
नामे १) रतन कुंडलिक मारकड वय ५० वर्षे, २) बाळु बाबुराव जाधव, वय ५४ वर्षे, दोघे रा. न्हावी ता. इंदापूर जि. पुणे यांना ताब्यात घेण्यात आले. त्यांनी शेतांमध्ये अफुची बेकायदेशीर विनापरवाना लागवड केल्याचे आढळून आले, त्या दरम्यान त्याच परिसरातील इसम नामे ३) कल्याण बाबुराव जाधव वय ६५ वर्षे रा. न्हावी ता. इंदापूर जि. पुणे हे त्यांचे शेतात उपस्थित
असताना त्या शेताची पाहणी केली असता त्यांचे शेतांमध्ये देखील अफुची बेकायदेशीर विनापरवाना लागवड केल्याचे आढळून
आल्याने त्यांना देखील ताब्यात घेण्यात आले. अफुची लागवड केलेली दिसून येवू नये याकरीता शेतात कांदा व लसून पिकांची
लागवड करून चहु बाजूने मका या पिकाचे उत्पादन घेण्यात आलेले होते. कारवाई दरम्यान एकूण २७ लाख ५६ हजार ४६०
रूपये किंमतीची सुमारे ८८३ किलो ग्रॅम वजनाची बोंडासह अफुची झाडे हस्तगत करणेत आलेली असून एकूण
इसमांविरोधात वालचंदनगर पोलीस स्टेशन येथे गु.र.नं. ६९ / २०२५ एन.डी.पी.एस. अॅक्ट कलम ८ ब, १५, १८, ३२,४६
प्रमाणे गुन्हा नोंदविणेत आलेला आहे.
सदरची कामगिरी मा. पोलीस अधीक्षक श्री. पंकज देशमुख, साो. पुणे ग्रामीण, मा. अपर पोलीस अधीक्षक श्री. गणेश
बिरादार, बारामती विभाग, यांचे मार्गर्शनाखाली मा. उपविभागीय पोलीस अधिकारी श्री सुदर्शन राठोड बारामती उपविभाग, यांचे
आदेशान्वये स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अविनाश शिळीमकर, बारामती तालुका पो स्टे च्या पो. नि. वैशाली पाटील,
वालचंदनगर पो. स्टे. चे स.पो.नि. राजकुमार डुणगे स्था. गु.शा. चे स.पो.नि. कुलदीप संकपाळ, स.पो.नि. राहुल गावडे, पोलीस
अंमलदार स्वप्निल अहीवळे, बाळासाहेब कारंडे, अभिजीत एकशिंगे, अजय घुले, ईश्वर जाधव, सचिन घाडगे, अजित भुजबळ,
विजय कांचन, योगेश नागरगोजे, धिरज जाधव, दगडु विरकर, आसिफ शेख, रामदास बाबर, बाळासाहेब खडके, अमोल शेडगे,
महेश बनकर, अतुल डेरे, मंगेश थिगळे, विभीषण सस्तुरे, वालचंदनगर पो स्टे कडील पो. स. ई. विजय तेळकीकर, पोलीस
अंमलदार रविंद्र पाटमास, बापू मोहिते, गुलाब पाटील, शरद पोफळे, विक्रमसिंअ जाधव, अभिजीत कळसकर, गणेश बनकर
बारामती तालुका पो स्टे चे महिला पोलीस अंमलदार स्मिता गायकवाड, मेघा शिंदे यांनी केली आहे.
No comments:
Post a Comment