बारामतीत टकारी समाजाचे राष्ट्रपती पदक पुरस्कार सन्मानित गणेश गायकवाड यांचा अप्पर पोलीस अधीक्षक यांच्या हस्ते सत्कार..
बारामती:- टकारी समाजाचे बारामती वसंतनगर चे सुपुत्र गणेश महादेव गायकवाड यांना मिळालेल्या राष्ट्रपदी पदक पुरस्काराने सन्मानित केल्यानंतर त्यांचा सत्कार बारामतीत श्री दत्त मंदिर समिती वसंतनगर व टकारी समाजाच्या वतीने अप्पर पोलीस अधीक्षक श्री गणेश बिरादार यांच्या हस्ते गणेश गायकवाड यांना सन्मानित करण्यात आले, यावेळी मा. उपनगराध्यक्ष अनिल गायकवाड, श्री अनिल अण्णा जाधव(राष्ट्रपती पदक),गटशिक्षणअधिकारी श्री संजय जाधव, ऍड अविनाश गायकवाड, मा. वरिष्ठ पोलीस अधिकारी विजय जाधव, सह अनेक जण उपस्थित होते, या कार्यक्रमाचे आयोजन श्रीदत्त मंदिर समिती अध्यक्ष महेश गायकवाड, ओंकार जाधव,सयाजी गायकवाड यांनी केले तर सुरेंद्र गायकवाड सर, महेंद्र गायकवाड, संतोष जाधव पत्रकार उपस्थित होते,यावेळी समाज बांधव व भगिनी मोठ्या संख्येने यावेळी अनेक मान्यवर यांनी आपले मनोगत व्यक्त करून गणेश गायकवाड यांचे कौतुकास्पद अभिनंदन केले, नुकताच 26 जानेवारी रोजी राष्ट्रपती पदक त्यांना मिळालेला सन्मान समाजाला कौतुकास्पद आहे, महाराष्ट्र कारागृह विभागातील अधिकारी व कर्मचारी यांना राष्ट्रपती पदक जाहिर
दिनांक 26 जानेवारी 2025 रोजीच्या भारतीय प्रजासत्ताक दिनाच्या औचित्यावर महाराष्ट्र कारागृह
वसुधार सेवा विभागातील खालील अधिकारी व कर्मचारी यांना गुणवत्तापूर्ण सेवेकरीता केंद्रीय गृह
विभागाकडून मा.राष्ट्रपतींचे सेवापदक जाहिर करण्यात आले होते.यामध्ये श्री. गणेश महादेव गायकवाड, हवालदार, येरवडा मध्यवर्ती कारागृह पुणे यांना पदक मिळाले,
उक्त नमूद कारागृह अधिकारी व कर्मचारी यांनी त्यांच्या सेवा कालावधीत शासकीय कर्तव्याती
दाखवलेली सचोटी व निष्ठा याबद्दल गुणवत्तापूर्ण सेवेकरीता सदर सेवापदक जाहिर करण्यात आले आहे.
सदरील सेवापदक हे नमुद अधिकारी व कर्मचारी यांच्या शासन सेवेतील निष्ठेचा सन्मान आहे.
यांचे सर्व स्तरातून
अभिनंदन करण्यात येत आहे.श्री दत्त मंदिर समिती व तसेच बारामती टकारी समाजाच्या वतीने त्यांचा सत्कार करण्यात आला आहे.
No comments:
Post a Comment