जम्मू काश्मीर मध्ये निष्पाप २८ पर्यटकांचा बळी घेणाऱ्या ४ संशयित दहशतवाद्यांचे फोटो आले समोर.. - vadgrasta

Breaking

  

Post Top Ad

Wednesday, April 23, 2025

जम्मू काश्मीर मध्ये निष्पाप २८ पर्यटकांचा बळी घेणाऱ्या ४ संशयित दहशतवाद्यांचे फोटो आले समोर..

जम्मू काश्मीर मध्ये निष्पाप २८ पर्यटकांचा बळी
घेणाऱ्या ४ संशयित दहशतवाद्यांचे फोटो आले समोर..
मुंबई:-अनेक देशांनी जम्मू काश्मीर मधील भ्याड हल्ल्याचा निषेध केला असून,जम्मू-काश्मिरच्या पहलगाममध्ये पर्यटकांवर भ्याड दहशतवादी हल्ला करणाऱ्या चारही दहशतवाद्यांचे फोटो समोर आले आहेत. अंगावर लष्कराचा गणवेश आणि हातामध्ये AK-47 रायफल घेऊन एकत्र उभे राहिलेला दहशतवाद्यांचा हा फोटो समोर आला असून सध्या तो व्हायरल होत आहे.
सुरक्षा यंत्रणांकडून दहशतवाद्यांचे स्केच काही वेळापूर्वी जारी करण्यात आले होते. त्यानंतर आता त्यांचा फोटो समोर आला आहे. हा भ्याड हल्ला करण्यापूर्वीचा हा दहशतवाद्यांचा फोटो असल्याचे म्हटले जात आहे. लष्करी जवानांच्या गणवेशात या दहशतवाद्यांनी बेछूट गोळीबार केला. या चार दहशतवाद्यांनी संपूर्ण देशाला
हादरवून टाकले. फोटोमध्ये दिसणाऱ्या या दहशतवाद्यांनी २८ पर्यटकांचा जीव घेतला. मृतांमध्ये दोन परदेशी नागरिकांचा देखील समावेश आहे. पाकिस्तानमधील दहशतवादी संघटना 'लष्कर-ए-तोएबा'च्या रेझिस्टन्स फ्रंट
या संघटनेने या हल्ल्याची जबाबदारी स्वीकारली आहे.या भ्याड हल्ल्याचा निषेध होत आहे.

No comments:

Post a Comment