बारामतीत क्रांतीदिन मोठ्या उत्साहात साजरा
बारामती: येथील हुतात्मा स्तंभाला अभिवादन करून ९ ऑगस्ट क्रांतीदिन बारामतीत साजरा करण्यात आला. १९४२ साली मुंबई येथील (गोवालिया टँक) ऑगस्ट क्रांती मैदान येथे भारत देश ब्रिटीशांच्या हुकूमशाहीतून मुक्त करण्याकरीता महात्मा गांधी यांनी चलेजाव, भारत छोडोचा नारा दिला होता तो दिवस म्हणजे ९ ऑगस्ट क्रांती दिन साजरा केला जातो. त्याचाच एक भाग म्हणून बारामतीतील वंदेमातरम चौक हुतात्मा स्तंभ, भिगवण चौक याठिकाणी सदरचे आयोजन बारामती तालुका स्वातंत्र सैनिक संघटना व बारामती तालुका स्वातंत्र उत्तराधिकारी संघटनेचे निलेशभई कोठारी यांनी केले होते.यावेळी बारामती नगरपरिषदेतर्फे राज्यशासनाने २ ते १५ ऑगस्टपर्यंत प्रत्येक घरावर हर घर तिरंगा अभियान राबविण्यात येणार आहे.या अभियानात प्रतिज्ञा,रॅली, पदयात्रा,राष्ट्रध्वज व तिरंग्याबाबत लोकांमध्ये जनजागृती करणे व तिरंग्याशी जोडण्यासाठी उपक्रम घेण्यात येणार आहे.याप्रसंगी नगरपरिषदेचे अधिकारी संजय चव्हाण व निलेशभई कोठारी यांनी उपस्थितांना तिरंगा प्रतिज्ञा म्हणवून घेतली.
यावेळी प्रांत अधिकारी वैभव नावडकर साहेब, तहसिलदार गणेश शिंदे साहेब,उपविभागीय पोलीस अधिकारी सुदर्शन राठोड साहेब,बारामती पोलीस निरीक्षक विलास नाळे साहेब,काँग्रेस शहराध्यक्ष ऍड.अशोक इंगुले,पुणे जिल्हा सचिव युवक कॉंग्रेस विरधवल गाडे,माजी नगर अध्यक्ष सुनिल पोटे, विरोधी पक्ष नेते सुनिल सस्ते, बारामती व्यापारी महासंघाचे स्वप्नील मुथा,वैभव कोठारी,वकील शाम पोटरे, राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाच्या (अजितदादा पवार गट महिला शहराध्यक्ष अनिता गायकवाड पत्रकार पत्रकार मन्सूर शेख,संतोष जगताप,एमआयएम जिल्हा अध्यक्ष फैयज शेख,वंचित जिल्हा अध्यक्ष मंगलदास निकाळजे, धनसिंग जगताप, सुरेंद्र मुथा,इत्यादी.अनेक सामाजिक,राजकीय क्षेत्रातील मंडळी तसेच स्वातंत्र्य सेनानी पत्नी जयश्री किर्वे,लिलावती तावरे,लता सूर्यवंशी,स्वातंत्र्य सैनिकांचे कुटुंब व उत्तराधिकारी यतीन कोठारी,चंद्रकांत जामदार,दिलीप तांबे,मोहनराव रणदिवे,जीवन मोदी,अक्षय मुळीक, धनयकुमार,जगताप,डॉ. मंगेश खंडागळे ,शेखर कोठारी,कबीरभई तांबोळी,वकील इनक्लब शेख,वकील मुकुंद बडवे,महादेव साळुंके,पवन घोरपडे,वर्षा किर्वे,पोपट गादीया, स्वानंद खंडागळे,सुभाष खंडागळे,रमेश भोकरे, मोहन मोरे,विश्वासराव नागवडे,सुश्मिता साळुंके,महावीर शहा, श्यामकाका जगताप, बापूराव जगताप (मंत्री), राजेंद्र मुळीक, नरेंद्र शहा,सुरेश समर्थ, शेखर कोठारी, बाळासाहेब काळे, वकील अजित कोकरे, राम खंडागळे, दीपक गालिंदे, दत्तात्रय गालिंदे,विशाल नागवडे,इस्माईल तांबोळी, मोठ्या संख्येने उपस्थित होते.
केएसीएफ इंग्लिम मिडीयम स्कूलच्या विद्यार्थ्यांनी वंदे मातरम गीत गायिले. भारत माता की जय, वंदे मातरमच्या जय घोषात भिगवण चौक दणाणून गेला होता. शेवटी वंदेमातरमाने कार्यक्रमाची सांगता झाली.
पोलीस प्रशासन,पत्रकार बंधू,बारामती नगरपरिषदेचे अधिकारी व कर्मचार्यांचे मोलाचे सहकार्य लाभले.
No comments:
Post a Comment