ब्लॅकमेल..अश्लील फोटो व्हायरल करण्याची धमकी देत लैंगिक अत्याचार... - vadgrasta

Breaking

Post Top Ad

Saturday, August 9, 2025

ब्लॅकमेल..अश्लील फोटो व्हायरल करण्याची धमकी देत लैंगिक अत्याचार...

ब्लॅकमेल..अश्लील फोटो व्हायरल करण्याची
धमकी देत लैंगिक अत्याचार...
बारामती:-बारामती तालुक्यातील एका मुलीचे अश्लील फोटो व्हायरल करण्याची धमकीतून लैगिंक अत्याचार झाल्याची तक्रार नुकताच दाखल झाली याबाबत मिळालेली माहिती नुसार फलटण जिल्हा सातारा येथील युवकाने
बारामती तालुक्यातील एका युवतीचे 2019 पासून जबरदस्तीने प्रस्थापित केलेल्या शरीरसंबंधाचे फोटो समाज माध्यमावर व्हायरल
करण्याची धमकी देत तिच्यावर वारंवार लैंगिक
अत्याचार केल्याप्रकरणी फलटण येथील गौरव आदेश निंबाळकर रा. फलटण, जि.सातारा वय 24 वर्ष या  तरुणावर वडगाव निंबाळकर पोलिसात बाल लैंगिक अत्याचार कायद्याअंतर्गत (POCSO)गुन्हा दाखल करण्यात आला
आहे.पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, नोव्हेंबर 2019 ते मे 2025 या कालावधीत
आरोपीने फलटण येथील आरोपीच्या घरा जवळ तसेच फलटण येथील लॉजमध्ये तसेच करंजेपुल ता. बारामती येथे आरोपीने पीडितेवर वारंवार अत्याचार केले.पीडिता नोव्हेंबर 2019 मध्ये
फलटण येथे इयत्ता 10 वी मध्ये शिकत असताना तिची आरोपीशी ओळख झाली.सुरुवातीला त्यांने पीडितेशी ओळख वाढवून तिच्याशी बोलत होता. मात्र 2020 मध्ये आरोपीने पीडितेला शरीसुखाची मागणी केली,त्यास तिने नकार दिला.त्यानंतर मात्र आरोपीने  शिवीगाळ व त्रास देणे सुरु केले. "मी तुझ्या घरच्यांना तुझ्याबाबत सांगेन, तुझी बदनामी करेन" अशा धमक्या देत राहिल्याने पीडितेने आरोपीशी फोनवर बोलणे बंद केले.दरम्यान पीडिता घरी एकटी असताना आरोपीने घरात घुसून " तु माझ्याशी फोनवर
बोल नाहीतर तुझ्या  घरच्यांना आपले लफडे आहे
असे सांगेन" अशी धमकी दिली. व नंतर काही
दिवसांनी आरोपीने पीडितेला फोन करून बोलावले, व मोटारसायकलवर बसवून फलटण येथील लॉजवर नेले आणि तिच्या इच्छेविरुद्ध
जबरदस्तीने शरीरसंबंध केले. त्यावेळी आरोपीने पीडितेचे मोबाईलमध्ये उघडे फोटो,तसेच दोघांचे उघडे फोटो आणि व्हिडिओ काढले. "हा प्रकार घरी सांगितल्यास  हे फोटो-व्हिडिओ सगळीकडे
व्हायरल करीन" अशी धमकी देऊन वारंवार
ब्लॅकमेल करत फेब्रुवारी 2024 पर्यंत वेळोवेळी
पीडितेशी जबरदस्तीने शारीरिक असंबंध ठेवले. यानंतर 7 ऑगस्ट 2025 रोजी सकाळी आरोपी
करंजेपुल येथे पीडितेच्या घरी आला. "माझ्यासोबत लॉजवर चल नाहीतर मोबाईलमधील तुझे उघडे फोटो-व्हिडिओ सोशल
मीडियावर व्हायरल करीन"अशी धमकी देऊन तीला मारहाण केली आणि "तुला सुखाने जगू देणार नाही"असे म्हणत जिवे मारण्याची धमकी दिली.सदर प्रकरणी वडगाव निंबाळकर पोलिसात
आरोपीविरुद्ध बाल लैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायदा(POCSO) सह विविध कलमांखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

No comments:

Post a Comment