भारतीय युवा पँथर संघटना स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका लढणार
बारामती : भारतीय युवा पँथर सामाजिक संघटनेचा चौथ्या वर्धापन दिनाचा कार्यक्रम बारामतीत पार पडला.कार्यक्रमाची सुरुवात छत्रपती शिवाजी महाराज व भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकाला अभिवादन करून करण्यात आली.
बारामती येथील संघटनेच्या कार्यालयात पदनियुक्ती कार्यक्रम घेण्यात आला.यावेळी पदाधिकारी कार्यकर्ते, सदस्य उपस्थित होते.
यावेळी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष गौरव अहिवळे यांनी बोलताना सांगितले की येत्या काळात स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका आहेत सदर निवडणुका आम्ही स्वबळावर लढणार आहोत.जोपर्यंत सर्वसामान्य लोकांसाठी काम करणारी लोक या संस्थांमध्ये निवडून जाणार नाहीत तोपर्यंत जनतेचे प्रश्न मार्गी लागणार नाहीत. लोकांचे प्रश्न सोडविण्यासाठी आम्ही संघटनेच्या माध्यमातून नेहमी काम करीत असतो.आमच्या संघटनेचे प्रतिनिधी या स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये निवडून गेल्यावर नक्कीच जनतेचे प्रलंबित प्रश्न मार्गी लावतील.सामाजिक काम करीत असताना सामान्य जनतेचे अनेक प्रश्न मार्गी लावण्याचे काम आम्ही संघटनेच्या माध्यमातून केले आहे. येत्या काळात आम्ही अशाच पद्धतीने सामाजिक काम करीत राहणार आहोत. चौथ्या वर्धापन दिनाच्या सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते,सदस्य यांना शुभेच्छा यावेळी दिल्या.
उपस्थित पदाधिकारी,सदस्य, कार्यकर्ते यांना संघटनेचे शुभम गायकवाड महाराष्ट्र राज्यसंपर्कप्रमुख, गणेश थोरात सरचिटणीस महाराष्ट्र राज्य, सौ. मंगलताई जाधव, अध्यक्ष पश्चिम महाराष्ट्र राज्य,अस्लम शेख कार्याध्यक्ष पश्चिम महाराष्ट्र, यांनी मार्गदर्शन केले.
कार्यक्रमाचे आयोजन रझिया शेख पश्चिम महाराष्ट्र उपाध्यक्ष, शिवाजी खंडाळे तालुकाध्यक्ष बारामती तालुका, समीर खान अध्यक्ष बारामती शहर,सदस्य प्रतीक चव्हाण,योगेश महाडिक,अमोल पाथरकर यांनी केले होते.
No comments:
Post a Comment