रक्षाबंधनाच्या धार्मिक शुभेच्छा देत दिले निवेदनाच्या प्रतीचे भाजपने दिले पत्र..
इंदापूर:- राखी धर्मरक्षणाची... कायद्याची मागणी भगिनींची.आपल्याला धर्म बंधुत्वाची राखी बांधत आहोत....रक्षाबंधनाच्या धार्मिक शुभेच्छा.....देत मागील काही वर्षांत महाराष्ट्रात लव्ह जिहादच्या घटनांमध्ये चिंताजनक वाढ झाली असून, यामध्ये पीडित महिलांना फसवून, धर्म व ओळख लपवून, लग्नाचे आमिष दाखवून त्यांच्यावर अत्याचार केले जात आहेत. या पार्श्वभूमीवर लव्ह जिहाद विरोधी कायदा महाराष्ट्र मध्ये लागू करणे अत्यावश्यक झाले आहे.
• लव्ह जिहाद विरोधी कायद्यात अपेक्षित तरतुदी पुढीलप्रमाणे असाव्यातः
१. ओळख लपवून केलेल्या विवाहास गुन्हा ठरवणे: जर कोणत्याही व्यक्तीने स्वतः ची खरी धार्मिक ओळख लपवून, खोटी माहिती देऊन,
फसवून किंवा दबाव आणून विवाह केला, तर तो विवाह बेकायदेशीर समजण्यात यावा व अशा व्यक्तीवर कठोर शिक्षा लागू करावी.
२. धर्मांतरासाठी फसवणूक, प्रलोभन, धमकी किंवा दबाव वापरणे गुन्हा ठरवणे: धर्मांतरासाठी केवळ प्रेमसंबंध, विवाहाचे आमिष,
आर्थिक किंवा सामाजिक दबाव यांचा वापर केल्यास अशा प्रकारांवर कठोर कारवाई होणे आवश्यक आहे.
३. ऐच्छिक धर्मांतरासाठी न्यायालयाची पूर्व परवानगी आवश्यक करणे, जेव्हा दोन वेगवेगळ्या धर्मातील व्यक्ती विवाह करतात आणि
त्यात धर्मांतराचा भाग असेल, तेव्हा त्यासाठी जिल्हा न्यायालयाची पूर्व परवानगी सक्तीची असावी, ज्यायोगे त्यामागील हेतू स्पष्टपणे
तपासता येईल.
४. गुन्ह्याच्या तपासासाठी विशेष यंत्रणाः प्रत्येक जिल्ह्यात विशेष तपास यंत्रणा स्थापन करून अशा घटनांचा त्वरित तपास होईल, याची
हमी दिली बावी
५. पीडित महिलांना संरक्षण व पुनर्वसनः मानसिक, सामाजिक व कायदेशीर मदतीसाठी स्वतंत्र महिला सहाय्यता केंद्र (Victim Support
Unit) स्थापन करण्यात यावेत, पीडित महिलांना निवारा, वैद्यकीय उपचार, मानसिक समुपदेशन व कायदेशीर मदतीची हमी दिली जावी.
• महिला सुरक्षेचे महत्त्व - केवळ कुटुंबापुरते मर्यादित नाही, तर समाजाच्या स्थैर्याचा मूलाधार
१. बहिणींच्या सुरक्षिततेवरच समाजाचा आधारः जर युवती सुरक्षित असतील, तरच पुढची पिढी सुरक्षित राहील, युवतींच्या फसवणुकीने
संपूर्ण कुटुंब उद्ध्वस्त होते. म्हणूनच महिला सुरक्षा हा केवळ वैयक्तिक किंवा कौटुंबिक मुद्दा नाही, तर हिंदू समाजाच्या अस्तित्वाशी
२. पोलिस यंत्रणेवर विश्वास निर्माण करणे गरजेचे: जर पीडित महिलांना तातडीने पोलीस मदत व संरक्षण मिळाले, तर समाजात विश्वास
वाढेल आणि इतर युवतींनाही जागरूक करता येईल.
३. समाजातील नैतिकता व संस्कृतीचा संरक्षण: हिंदू समाजाच्या सांस्कृतिक मुल्यांचा नाश करण्याचा एक गुम हेतू अशा घटनांमध्ये दिसून
येतो. म्हणूनच याला विरोध करण्यासाठी कायदेशीर, सामाजिक आणि राजकीय पातळीवर जागरूकता अत्यावश्यक आहे.
आज या पवित्र रक्षाबंधनाच्या दिवशी, आम्ही संकल्प करतो की हिंदू बहिणींच्या रक्षणासाठी सर्व कायदेशीर व सामाजिक मार्गांनी
आवाज उठवू. आणि आपल्या रूपाने आम्हाला विधानसभेत एक प्रभावी आवाज मिळेल, अशी आम्हाला खात्री आहे.असे पत्र सकल हिंदू समाजाच्या वतीने निवेदनादिली असून त्याची प्रत भारतीय जनता पार्टी महिला मोर्चा प्रदेश अध्यक्ष चित्रा ताई वाघ, पुणे जिल्हा अध्यक्ष (दक्षिण) स्नेहल ताई दगडे, पुणे यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा उपाध्यक्ष शितल ताई साबळे,शहर अध्यक्ष माधुरी भराटे,रुपाली रणदिवे, सलमा ताई खान,सुनंदा भगत व भाजप महिला कार्यकर्ता यांनी कृषी मंत्री दत्ता मामा भरणे यांना देण्यात आली यावेळी दत्ता मामा भरणे यांना महिलांनी रक्षा बंधन चे औचित्य साधत राखी बांधली.
No comments:
Post a Comment