पुणेकरांना पाहायला मिळणार लंडन ब्रिज आणि युरोपियन स्ट्रीट... - vadgrasta

Breaking

Post Top Ad

Friday, September 19, 2025

पुणेकरांना पाहायला मिळणार लंडन ब्रिज आणि युरोपियन स्ट्रीट...

पुणेकरांना पाहायला मिळणार  लंडन ब्रिज आणि युरोपियन स्ट्रीट.
पुणे/प्रतिनिधी :- डी.जे.अम्युजमेंट प्रस्तुत महाराष्ट्रात प्रथमच पुणेमध्ये  लंडन ब्रिज,युरोपियन स्ट्रीट एक्झीबीशन भरविण्यात आले आहे. दरवर्षी नवनवीन संकल्पना घेऊन येणाऱ्या डी.जे.अँम्युझमेंटने यावर्षी पुणेकरांना आता एक नवी नगरी घेऊन आले आहेत ज्यामध्ये लंडनचा ब्रिज आणि युरोपियन स्ट्रीट हे हुबेहूब चित्रांच्या माध्यमातून पहावयास मिळणार आहे.आणि लंडन ब्रीज वरून जाण्याची संधी उपलब्ध करून देण्यात आली आहे. येथील शिवगोरक्ष ग्राउंड,कात्रज-कोंढवा रोड, पुणे याठिकाणी शुक्रवार दि.१९/९/२०२५ पासून दररोज सायं ५ वाजलेपासून रात्री १० वाजेपर्यंत पाहायला मिळणार आहे, ही पर्वणी पुणेकरांसाठी आहे.अशी माहिती जयराज (मॅनेजर),रवी नायर,संतोष जाधव यांनी पत्रकार परिषदेत दिली.याचे उद्घाटन मा. नगरसेवक प्रकाशभाऊ कदम यांच्या हस्ते करण्यात येणार आहे. यावेळी प्रमुख पाहुणे उपस्थित राहणार आहेत.  याठिकाणी उभा करण्यात आलेला लंडन ब्रीज हा १८० फुटाचा आहे.याची उंची ४५ फूट आहे तर रुंदी १५ फूट आहे.याचबरोबर चित्रांच्या माध्यमातून विद्युत रोषणाई  करून युरोप सिटी उभी करण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे.याठिकाणी लहान मुले ते सर्व वयोगटातील लोक धमाल मस्ती आणि मनोरंजन  करणार आहेत.जायंट व्हील, कोलंबस, ड्रॅगनट्रेन, ब्रेक डान्स,मोठा पाळणा इत्यादींमध्ये आनंदाने राइड करू शकणार आहेत.तर मुलांसाठी पेडलबोट, जंपिंग, मिनी ट्रेन इत्यादी अनेक मनोरंजक राइड्स आहेत. घरगुती वस्तू, क्रीडा उपकरणे, कूलिंग भांडी, मुलांसाठी खेळणी आणि तयार कपडे हे सर्व एकाच छताखाली पाहण्याची आणि खरेदी करण्याची संधी या प्रदर्शनाच्या माध्यमातून मिळाली आहे.शिवाय पुस्तकांचाही स्टॉल आहे ज्याठिकाणी डिस्काउंट मध्ये पुस्तके खरेदी करता येणार आहेत.याचबरोबर स्वादिष्ट खाद्यपदार्थ, स्नॅक्स, पॉप-कॉर्न, कॉटन कँडी, सोलापुरी, पाणीपुरी, चाट, उटीचिल्ली बज्जी, कूलड्रिंक्स, आईस्क्रीम, चिल्ली गोबि मिरची भजी खाण्यास मिळणार आहेत.शिवाय सेल्फीही काढता येणार आहे.तरी पुणेमध्ये प्रथमच आलेल्या या नगरीस पुणेकरांनी अवश्य भेट द्यावी असे आवाहन संयोजकांनी केले आहे.



No comments:

Post a Comment