“आई मला माफ कर,मला ब्लॅकमेल केले असून खूप मानसिक त्रास दिला..".प्रेयसीच्या नातेवाईकाच्या त्रासाला कंटाळून युवकाची आत्महत्या..
बारामती:- बारामतीत आत्महत्या करण्याचे प्रकार वाढत असून कोणी बायकोच्या त्रासाला कंटाळून तर कुणी सावकारी त्रासाला कंटाळून तर कुणी आजारपणाला कंटाळून आत्महत्या करीत असल्याचे कळतंय,तर आत्ता प्रेयसीच्या त्रासाला कंटाळून आत्महत्या केल्याचे पुढं आले आहे, मिळालेल्या माहितीनुसार बारामतीतील तरुणाला लग्नाचे आमिष दाखवून फसवणूक केली, त्यातून ब्लॅकमेलिंग आणि सततच्या मानसिक त्रासाला कंटाळून एका २३ वर्षीय तरुणाने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना बारामती तालुक्यातील रुई बयाजीनगर येथे घडली आहे.याप्रकरणी बारामती तालुका पोलीस
ठाण्यात तिघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. विक्रम उर्फ बबलू नवनाथ कोळपे (वय २३,रा.रुई बयाजीनगर, बारामती) असे
आत्महत्या केलेल्या तरुणाचे नाव आहे.
याप्रकरणी त्याचा मामा सत्यवान आप्पा
इंगळे (रा. सोलापूर) यांनी फिर्याद दिली
आहे. पोलिसांनी याप्रकरणी पुण्यातील
खडकवासला येथील प्रेयसी व तिच्या
आई-वडिलांविरोधात भारतीय न्याय संहिता (BNS) कलम १०८, ३५१ (२),३५१(३), ३५२ आणि ३(५) अन्वये गुन्हा नोंदवला आहे.मिळालेल्या माहितीनुसार, मृत विक्रम
आणि आरोपी सृष्टी यांचे गेल्या पाच
वर्षांपासून प्रेमसंबंध होते. फिर्यादीत नमूद
केल्यानुसार, सृष्टीने सुरुवातीला लग्नाचे
आमिष दाखवले, मात्र नंतर घरच्यांचे
कारण सांगून लग्नास नकार दिला. २७
डिसेंबर २०२५ पासून सृष्टी आणि तिच्या
बहीणीने विक्रमला सातत्याने फोन करून
मानसिक त्रास देण्यास व ब्लॅकमेल करण्यास सुरुवात केली होती.पुणे येथे बोलावून घेऊन विक्रमच्या मोबाईलमधील फोटो आणि चॅटिंग जबरदस्तीने डिलीट करण्यात आले व
त्याला जीवे मारण्याची धमकीही देण्यात
आली होती. तसेच सृष्टीच्या वडीलाने
देखील विक्रमच्या नातेवाईकांना फोनवरून दमदाटी केल्याचा आरोप फिर्यादीत करण्यात आला आहे.दि.१५ फेब्रुवारी २०२६ रोजी संध्याकाळी ७ ते ७:४५ च्या सुमारास विक्रमने राहत्या घरातील किचनमध्ये गळफास घेतला.
आत्महत्येपूर्वी त्याने एक सुसाईड नोट
लिहून ठेवली होती. यामध्ये त्याने म्हटले
आहे की, “आई मला माफ कर,मला ब्लॅकमेल केले असून खूप मानसिक त्रास दिला जात आहे, त्यामुळे मी हा निर्णय घेत आहे”. या चिठ्ठीत त्याने आरोपींनी केलेल्या त्रासाचा सविस्तर उल्लेख केला आहे.या प्रकरणाचा अधिक तपास पोलीस
उपनिरीक्षक अमोल आनंद कदम करत आहेत.
No comments:
Post a Comment