बारामती मध्ये गौण खनिज वाहतुक 24 तास खुली न केल्यास गौण खजिन उत्पादक व वाहतुकदार बारामती, दौंड, इंदापूर यांचेकडून भिगवण चौक येथे चक्का जामचा इशारा - vadgrasta

Breaking

Post Top Ad

Monday, October 13, 2025

बारामती मध्ये गौण खनिज वाहतुक 24 तास खुली न केल्यास गौण खजिन उत्पादक व वाहतुकदार बारामती, दौंड, इंदापूर यांचेकडून भिगवण चौक येथे चक्का जामचा इशारा


बारामती मध्ये गौण खनिज वाहतुक 24 तास खुली न केल्यास गौण खजिन उत्पादक व वाहतुकदार बारामती, दौंड, इंदापूर यांचेकडून भिगवण चौक येथे चक्का जामचा इशारा
बारामती:-दिनांक 27/07/2025 रोजी महात्मा फुले चौक, खंडोबानगर, बारामती याठिकाणी अपघात होऊन अपघातामध्ये मोटारसायकल चालक व त्याचेसोबत असलेल्या दोन लहान मुली यांचा मृत्यू झाला. सदर दुर्घटनेत मृत्यूमुखी पडलेल्या कुटूंबाच्या दुःख प्रसंगात बारामती, दौंड, इंदापूर येथील गौण खजिन उत्पादक व वाहतुकदार सामील होऊन जनभावनेचा आदर करून बारामती शहरामध्ये ट्रक, हायवा, टिपर, डंपर अशा अवजड वाहनांचा वेग मर्यादा 30 किलोमीटर प्रति तास ठेवून वाहतुकीकरीता परिवहन कार्यालयाच्या नियमानुसार असणारे सर्व कागदपत्रांची व तत्सम बाबींची पुर्तता करूनच मालवाहतुक करीत होते व आहे. 
परंतु प्रशासनास 24 तास वाहतुक खुली करण्याबाबत वारंवार विनंती करून देखील कोणताही सकारात्मक प्रतिसाद मिळत नसल्यामुळे बारामती शहर पोलीस स्टेशन वाहतुक शाखेचे अधिकारी व कर्मचारी यांनी बारामतीतील काही पत्रकारांना घेऊन ‘अपघातमुक्त बारामती’ या नावाने बारामतीतील वाहतुक सुरळीत होणेकरिता व्हाॅटस् अॅप ग्रुप तयार करून चांगले कार्य करीत असल्याचे बारामतीतील प्रशासकीय वरिष्ठ अधिकारयांना भासवून देत होते व बारामती शहरातील गौण खजिन वाहतुकदार व उत्पादन करणारे तसेच अवजड वाहतुकीकरिता 8-8 दिवसांचे सर्कुलर काढण्यात येत होते. त्या सर्कुलर प्रमाणे वाहतुकीच्या नियमांना अधिन राहून वाहतुक करीत होते. परंतु सदर सर्कुलरची मुदत संपण्याच्या 1-2 दिवसांपूर्वी सदर बारामती शहर पोलीस स्टेशन वाहतुक शाखेचे अधिकारी, कर्मचारी व त्यांचे साथीदार/पत्रकार काहीही कारण काढून सदर सर्कुलरची मुदत उपरोक्त संदर्भिय पत्रात नमुद केले प्रमाणे आतापर्यंत 5 वेळेस वाढवून घेतली आहे. 
  सदरच्या 8 दिवसांच्या सक्र्युलर मुळे बारामती मध्ये जी काही विकासाची कामे चालु आहेत या विकास कामांमध्ये अडथळा येत आहे, त्यामुळे काम चालु असलेल्या साईटवर वेळेवर माल पुरविला जात नाही याचा त्रास बारामतीतील बांधकाम व्यावसायीकांनाही होत आहे. याबाबत आम्ही वेळोवेळी प्रशासनाकडे जाऊन निवेदनाच्या माध्यमातुन बारामतीतील बायपास द्वारे वाहतुक करण्याकरिता विनंती केली. परंतु तसे न बारामती शहर पोलीस स्टेशन वाहतुक शाखेचे अधिकारी यांनी रात्री 9.00 ते सकाळी 7.00 व दुपारी 12.00 ते 4.00 या वेळेत वाहतुक करण्याबाबत सांगितले. परंतु रात्रीच्या वेळेस अंधारात डोंगर माथ्यावरील खडी क्रशर पाॅईंट वर जाऊन वाहतुक करणे जोखमीचे होत आहे. 
बारामती शहर पोलीस स्टेशन वाहतुक शाखा यांनी सुरू केलेल्या व्हाॅटस्् अॅप ग्रुप मधील पत्रकार व काही ग्रुप मेंबर बारामतीतील विविध चैकांमध्ये थांबुन आमच्या विरूध्द बारामती वाहतुक शाखेमध्ये तक्रारी करतात, त्यानंतर लगेच वाहतुक शाखेतील पोलीस आमच्या वाहनांवर दंडात्मक कारवाई करून पैसे उखळण्याचे काम करीत आहेत. तसेच सदर वाहतुक पोलीसांबरोबर सामील असलेले पत्रकार देखील आमच्या गाड्या आडवुन आम्हास पैश्याची मागणी करीत आहेत. त्यामुळे आम्ही सर्व खालील सह्या करणारे वाहतुकदार त्रस्त झालो आहोत.
साहेब आम्ही शासनाने घालुन दिलेल्या सर्व नियम व अटींचे पालन करून मालक वाहतुक करीत आहोत. आमचेपैकी बहुसंख्य वाहतुकदार व गौण खनिज उत्पादकांनी वेगवेगळ्या बॅंक/फायनान्स कडून कर्ज घेलेले आहे आमच्या व्यवसायावर या ना त्या कारणाने गदा आणली जात आहे. त्यामुळे आम्हास व्यवसाय करणे कठीण झाले असून आमचे बॅंकेचे हप्तेही भरणे मुश्कील झाले आहे. 
तरी बारामती मध्ये पूर्वी प्रमाणेच 24 तास गौण खनिज वाहतुक सुरू करणेबाबत बारामती, दौंड, इंदापूर येथील गौण खजिन उत्पादक व वाहतुकदार यांचेकडून दिनांक 13/10/2025 रोजी लेखी निवेदन देण्यात आलेले असून त्यास अनुसरून बारामती शहरामध्ये 24 तास गौण खनिज वाहतुक सुरू न केल्यास नाईलाजास्तव बारामती, दौंड, इंदापूर येथील गौण खजिन उत्पादक व वाहतुकदार त्यांचेकडे असलेल्या अंदाजे 2200 ते 2500 ट्रक, हायवा, टिपर, डंपर व इतर वाहनांसह दिनांक 16/10/2025 रात्री 9.00 ते सकाळी 8.00 पर्यंत भिगवण चौक, बारामती येथे चक्का जाम आंदोलन करण्याचा इशादा दिलेला आहे.

No comments:

Post a Comment