बारामतीत लॉज ची जाहिरात करणं भोवलं, गुन्हा दाखल.
जाणीवपूर्वक कायदा हातात घेतात असाच प्रकार एमआयडीसी मध्ये घडलेला आहे.व्हीआयपी लॉज या नावाने सुरू असलेल्या लॉज चालकाविरुद्ध शहर विद्रुपीकरण कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. बारामती शहरातील भिगवन रोड सिटी इन चौक परिसरात स्ट्रेट लाईट डीपी बॉक्सवर व्हीआयपी लॉज नावाने जाहिराती लावण्यात आल्या होत्या या जाहिराती बारामती नगर परिषदेच्या निर्दशनास
आल्यानंतर महाराष्ट्र मालमत्ता विद्रुपण,प्रतिबंध अधिनियमनुसार, व्हीआयपी लॉजचे मालक श्रीकांत घुले राहणार काटेवाडी ता.बारामती यांच्यावर नगर परिषद अतिक्रमण विभागाचे कर्मचारी संजय प्रभुणे यांच्यामार्फत तालुका पोलीस स्टेशन येथे फिर्याद देण्यात आल्यानंतर गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. बारामतीत सार्वजनिक ठिकाणी कोणतेही फलक, जाहीराती अथवा पोस्टल लावण्यास मनाई आहे.त्यामुळे इथून पुढे अशा पद्धतीने नियमाचे कोणी उल्लंघन केल्यास बा.न.प नगरपरिषद प्रशासनाकडून गुन्हा दाखल करण्यात येईल असा इशारा देण्यात आलेला आहे.
No comments:
Post a Comment