माळेगाव:- नुकताच अवैध धंदे विरुद्ध पोलिसांनी मोहीम उघडली असून माळेगाव पोलीस स्टेशन हद्दीत गावठी दारू विक्री असल्याने माळेगाव पोलीस स्टेशन गु.र.नं 270/2025 कलम महाराष्ट्र दारूबंदी अधिनियम कलम 65(ई) प्रमाणे अमोल संदिपान राउत, पोलीस कॉस्टेबल माळेगाव पोलीस स्टेशन यांच्या फिर्यादी वरून आरोपी 1) रोहित संभाजी कोळी, रा. येळेवस्ती धुमाळवाडी रोड ता. बारामती जि.पुणे 2) बाबु राठोड राहणार सोलापूर यांना दि.15/10/2025 रोजी रात्रौ 20/40 वा.चे दरम्यान मौजे धुमाळवाडी रोड ता. बारामती जि.पुणे याठिकाणी कारवाई केली,याबाबत सविस्तर माहिती अशी की,दि.16/10/2025 रोजी रात्रौ 21/00 वा चे सुमारास मौजे धुमाळवाडी रोड येळेवस्ती येथे 1) रोहित संभाजी कोळी, धुमाळवाडी रोड ता. बारामती जि.पुणे 2) बाबु राठोड रा. सोलापूर याचेकडुन विकत घेवुन गावठी हातभट्टीची तयार दारू आपल्या ओळखीच्या लोकांना विक्री करीत असताना मिळुन आला त्याचे कब्जात एक काळे रंगाचे 40 लिटर मापाचे प्लॅस्टिकचे कॅन्ड 35 लिटर गावठी हात भट्टीची तयार दारू व त्यास लागणारे इतर साधने असा एकुण 3000/-रूपयाचा माल आपले कब्जात बाळगले असता मिळुन आला म्हणून त्यांचे विरुध्द सरकार तर्फे कायदेशिर फिर्याद दाखल अंमलदार -पो हवा वाघमोडे यांनी करून घेतली तर तपास अंमलदार-पोहवा पांढरे यांनी केला असून असे अवैध आढळून आल्यास कारवाई केली जाईल तसेच या माळेगाव व पणदरे या भागात अवैध धंदे दिसल्यास कारवाई होणार असल्याचा विश्वास नागरिकांमध्ये निर्माण झाला आहे.पोलिसांचे या कारवाई मुळे कौतुक होत आहे.
Post Top Ad
Friday, October 17, 2025
Home
ताज्या घडामोडी
माळेगाव
माळेगाव पोलीस स्टेशन हद्दीत गावठी दारूवर कारवाई..अवैध धंदेवर कारवाईची उघडली मोहीम.!
माळेगाव पोलीस स्टेशन हद्दीत गावठी दारूवर कारवाई..अवैध धंदेवर कारवाईची उघडली मोहीम.!
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment