दौरा नेत्यांचा अन् ताण पोलिसांना,सणासुदीला कुटुंबाला देऊ शकत नाही वेळ.. - vadgrasta

Breaking

Post Top Ad

Saturday, October 18, 2025

दौरा नेत्यांचा अन् ताण पोलिसांना,सणासुदीला कुटुंबाला देऊ शकत नाही वेळ..

दौरा नेत्यांचा अन् ताण पोलिसांना,सणासुदीला कुटुंबाला देऊ शकत नाही वेळ..
बारामती:- लोकसभा, विधानसभा झाल्या त्यानंतर आरक्षण, मोर्चे झाले त्यानंतर नेते, मंत्री यांचे दौरे सुरू झाले, लोकसभेच्या व विधानसभा निवडणुकीत पक्षांच्या नेत्यांचे दौरे आणि सभांचा धडाका सुरू होता यादरम्यान पोलीसाची बंदोबस्तासाठी किती कसरती झाल्या हे एखादया कर्मचाऱ्यांना विचारल्यावर त्यांचा व्यथा किती भयानक आहे हे समजेल,त्यातच निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर होणाऱ्या बैठकांसाठी बंदोबस्त आणि त्यासाठी आवश्यक ती माहिती गोळा करण्यात पोलिसांचा वेळ जात होता. नेते मंडळींच्या या दौऱ्यांमुळे पोलिसांना रणरणत्या उन्हात चांगलीच कसरत करावी लागली होती, निवडणुकीचे वारे वाहण्यापूर्वीच पोलिसांना तयारी करावी लागत होती. बैठका, सभा,
मागील  वर्षातील माहिती, सभांव्य उपद्रवी,उपद्रवी मतदान केंद्रे ही सारी माहिती देवून हैराण झालेल्या पोलिसांना आता परत जोमाने कामाला लागावे लागले होते.  लोकसभा व विधानसभा निवडणुकीत डोकेदुखी ठरू शकणाऱ्या उपद्रवींवर प्रतिबंधात्मक 
कारवायांचा धडाका सुरू होता. त्यातच नेत्यांचे दौरे असल्याने पोलिस चांगलेच हैराण झाले होते,दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर एक दिवस आगोदरच पोलिसांना बंदोबस्ताच्या तयारीत लागावे लागते. त्यामुळे सध्या पोलिस रणरणते उन आणि रोजचा बंदोबस्त यामुळे हैराण झाले होते तर कधी भर पावसात देखील बंदोबस्ताच्या तयारीत लागावे लागले होते, त्यामुळे सध्या पोलिस रोजचा बंदोबस्त यामुळे हैराण झाले आहेत.नेते, मंत्री येणार म्हणून पहाटेपासूनच तयारीत असणारा पोलीस आजही सण सूद असताना आपल्या कुटुंबाला वेळ देऊ शकत नाही की त्यांच्या आनंदात सहभाग होऊ शकत नाही हे दुर्दैव आहे, त्यामुळे सणासुदीला तरी नेत्यांनी दौरे काढू नये जेणे करून पोलीस (तो सुद्धा माणूस आहे)त्याला कुटुंबासोबत आनंद साजरा करता येईल.

No comments:

Post a Comment