बारामती: सावळ येथील ज्ञानसागर गुरुकुल स्कूलच्या वतीने पूरग्रस्तांना मदत म्हणून दहा लाख एकवीस हजाराची मदत देण्यात आली.
बारामती तालुक्यातील ज्ञानसागर गुरुकुल चे संस्थापक अध्यक्ष प्रा.सागर मानसिंग आटोळे यांच्या पुढाकारातून शाळेतील विद्यार्थी, शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारीवर्गानी केले. ऐवढच नाही तर इतर अनेक पूरग्रस्त शेतकऱ्यांना धीर देण्याचे काम ज्यांनी केले आश्या शिवार फाऊंडेशनला ५ लाख रुपयांचे आर्थिक पाठबळ दिले व मुख्यमंत्री सहायता निधी साठी ५ लाख २१ हजार रुपयांची आर्थिक मदत देऊन या महापुराच्या संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांना भर दिवाळीच्या तोंडावर ज्ञानसागर गुरुकुलच्या माध्यमातून दहा लाख एकवीस हजार रुपयांची आर्थिक मदत करुन सामाजिक बांधिलकीची जाणिव निर्माण देणारा एक आदर्श महाराष्ट्र समोर ठेवला
दिवाळी जवळ आली की सगळीकडे उत्साहाचं वातावरण असतं. पण याच वेळी, अनेक शेतकरी मात्र महापूरामुळे उद्वस्त झालेल्या संसाराच्या ओझ्याखाली, निसर्गाच्या लहरीपणामुळे झालेल्या नुकसानीत अडकलेले असतात. दिवाळीचा सण उजळवण्यासाठी त्यांच्याकडे ना पुरेसा पैसा असतो, ना समाधान.
अशा वेळी जर एखादा मदतीचा हात पुढे येतो — मग तो एखादा सामाजिक कार्यकर्ता असो, सहकारी संस्था, एखादी खासगी कंपनी, की सरकार — तर तो कैवारी ठरतो. हा कैवारी शेतकऱ्यांना दिवाळीपूर्वी थोडीशी आर्थिक मदत देतो.
असाच एका कैवारी महाराष्ट्रातील अनेक ठिकाणी झालेल्या पूरग्रस्त परिस्थितीमुळे हजारो शेतकरी हतबल झाले होते. आश्या परिस्थिती थेट शेतकऱ्यांपर्यंत पोहचून आर्थिक मदत शेतकऱ्याना केल्यामुळे अनेक शेतकऱ्यांचे प्राण वाचवण्याचे पवित्र कार्य ज्ञानसागर गुरुकुल ने केलेले समाधान व पुण्य असल्याचे
प्रा.सागर मानसिंग आटोळे यांनी सांगितले.
No comments:
Post a Comment