दिवाळीत उजाळा द्या पण इतिहास विसरू नका
बारामती:- येणाऱ्या पुढील अत्याधुनिक तंत्रज्ञान च्या काळात नवीन पिढीला इतिहास माहीत व्हावा,किल्ल्या चे महत्व कळावे ,पहाता यावे या साठी गड किल्ले यांचे संवर्धन होणे गरजेचे असल्याचे प्रतिपादन व्यख्याते व आहार तज्ञ अभिषेक ढवाण यांनी केले.
शुक्रवार १७ ऑक्टोम्बर वसूबारस निमित्त पशुधन पूजन व
' माझा महाराष्ट्र आमचा किल्ला'या विषयावर आयोजित कार्यक्रमात ढवाण मार्गदर्शन करत होते.
सदर कार्यक्रम चे आयोजन गड किल्ले संवर्धन परिषद, बारामती शाखा यांच्या वतीने करण्यात आले होते बारामती तालुक्यातील विविध ठिकाणी बनविलेले किल्ले यांची पाहणी करून विविधता, बनवायची पर्यावरण पूरक पद्धत,इतिहास मुर्त्या, छोटी झाडे आदी माध्यमातून जागृत दाखविण्याची पद्धत आदी ना गुण देऊन उत्कृष्ट किल्ला यांना सन्मानित करण्यात येणार आहे.
या प्रसंगी आदित्य पोतेकर व दुर्ग भ्रमंती फौंडेशन चे विजय मेहता,चंद्रकांत लोंढे,भटकंती ट्रॅव्हल्स चे अजय हंगे व इतर मान्यवर उपस्तीत होते.
आपण महाराष्ट्रात जे किल्ले पाहतो ते त्या काळातील भव्य आणि देखण्या वास्तूचे फक्त अवशेष आहेत. १६व्या शतकात हे किल्ले इतिहास घडतानाचे साक्षीदार होते आणि त्यावेळी ते अप्रतिम वास्तुकलेने सजलेले प्रत्येक निवासस्थान होते.
त्या काळातील किल्ला जसा आपल्या वैभवात होता, तसा प्रत्येक किल्ला सध्या समोर आणण्याचा प्रत्येकाचा प्रयत्न आहे केवळ दगडांचे अवशेष नव्हे तर त्याचे खरे रूप दाखवण्याचा प्रयत्न दिवाळीत करावा असेही अभिषेक ढवाण यांनी सांगितले.
प्रत्येक स्पर्धेक यांनी दिवाळीत किल्ला बनवून उजाळा द्या परंतु आयुष्यभर इतिहास विसरू नका ,वाचन करा,मोबाईल च्या युगात मागील पिढीने दिलेले योगदान विसरू नका असे आव्हान विविध मान्यवरांनी केले
आदित्य पोतेकर यांनी आभार मानले.
No comments:
Post a Comment