बारामती:-उत्सव काळात कमानी उभे करणे म्हणजे बारामतीत स्पर्धा लागते कुठल्या चौकात, कुठल्या रस्त्यावर कमानी टाकून व्यावसायाची जाहिरात, राजकीय पक्षाच्या जाहिरातीचे बॅनर लावले पाहिजे याची चढाओढ लागते,गणेशोत्सवाच्या निमित्ताने लावण्यात आलेल्या या स्वागत कमानी गणेशोत्सवानंतर काढल्या जातील अशी नागरिकांना आशा होती. त्यामुळे गणेशोत्सवाच्या काळात नागरिकांनी
कोंडीत अडकूनही त्या स्वागत कमानी सहन केल्या.काही वेळा अपघात झाले, त्यानंतर स्वागत कमानी हटल्या नाही तर त्या वाढल्या.गणेशोत्सवात नागरिकांना शुभेच्छा
देण्यासाठी महत्वाच्या रस्त्यांसह अंतर्गत रस्त्यांवर
लावण्यात आलेल्या स्वागत कमानी उत्सव संपले तरी हटवले जात नसल्याने नागरिकांत संताप आहे. शहराच्या मध्यवर्ती भागातून जाणाऱ्या चौकातून ठिकठिकाणी विविध कमानी वाहतुकीला अडथळा ठरत आहेत.उत्सव संपल्यानंतरही त्या जैसे थे' असल्याने दररोज वाहतूक कोंडीचा सामना करावा लागतो आहे. कोंडी सोडवण्यासाठी पालिकेत बैठका घेणारे पक्ष रस्त्यावर मात्र नागरिकांचीच वाट अडवत असल्याने त्या पक्षांविरूद्ध नाराजी आहे.
राजकीय पक्षांच्या चमकोगिरीमुळे नागरिकांची वाट रोखली गेल्याचे दिसून आले होते. ऐन पावसाळा भरात असताना राजकीय पक्षांकडून बारामती शहरात स्वागत कमानी लावण्यात आल्या. गणेशोत्सवाच्या निमित्ताने लावण्यात आलेल्या या स्वागत कमानी गणेशोत्सवानंतर काढल्या जातील अशी नागरिकांना आशा होती. त्यामुळे गणेशोत्सवाच्या काळात नागरिकांनी कोंडीत अडकूनही त्या स्वागत कमानी सहन केल्या. त्यानंतर स्वागत कमानी हटल्या नाही तर
त्या वाढल्या.कमांनींमुळे नागरिकांना चालणेही दुरापास्त झाले.बारामती शहरातील सर्वाधिक वर्दळीच्या भिगवण चौकात सध्या याच कमानींमुळे वाहनांना वळताना अडचण येत असून कोंडी होते आहे. स्वागत कमान
लावण्याचाही पराक्रम राजकीय पक्षांनी व व्यावसायिक यांनी केला. अरूंद पदपथ व्यापला गेला.सुरूवातील गणेशोत्सव, नंतर स्पर्धा, नंतर नवरात्रोत्सव आणि त्यापुढे दसरा अशा सर्व शुभेच्छा या कमानींच्या माध्यमातून देण्यात आल्या.आत्ता दिवाळीच्या विविध दुकानाच्या जाहिराती कमानींवरचे संदर्भ आणि सर्वाधिक वर्दळीच्या भिगवण रोड,इंदापूर चौक,गुणवडी चौक,गांधी चौक, सुभाष चौक व एमआयडीसी चौक व भिगवण चौक सध्या याच कमानींमुळे वाहनांना वळताना अडचण येत असून
कोंडी होते आहे. स्वागत कमानी मुळे अरूंद पदपथ व्यापला गेला.सुरूवातीला गणेशोत्सव, नंतर स्पर्धा, नंतर नवरात्रोत्सव आणि त्यापुढे दसरा अशा सर्व शुभेच्छा या कमानींच्या माध्यमातून देण्यात आल्या. कमानींवरचे संदर्भ आणि शुभेच्छा,जाहिराती बदलल्या. मात्र कमानी हटल्या नाहीत. त्यामुळे आता दिवाळीपर्यंत आणि त्यापुढच्या सणांसाठी या कमानी ठेवल्या आहेत का, असा प्रश्न उपस्थित केला
जातो आहे. या कमानींमुळे नागरिकांत संतापाचे
वातावरण असून अतिक्रमण कारवाईत दुकाने हटवणारे पालिका प्रशासनही या कमानींकडे दुर्लक्ष करत असल्याचे चित्र आहे.याबाबत तरी प्रशासन आत्ता तरी दखल घेईल का?असा सवाल विचारला जातोय.
No comments:
Post a Comment