बारामती शहरातील कंत्राटी कर्मचाऱ्यांसाठी लढा देणार : गौरव अहिवळे
बारामती : बारामती नगर परिषद कंत्राटी कर्मचारी यांच्या मागण्यांचे निवेदन भारतीय युवा पँथर संघटना व कंत्राटी कर्मचारी प्रतिनिधी यांच्यामार्फत मुख्याधिकारी नगर परिषद यांना देण्यात आले. मुख्याधिकारी यांनी निवेदनातील मागण्यांवर आम्ही नक्कीच कारवाई करू आणि कर्मचाऱ्यावर प्रशासन अन्याय होऊ देणार नाही असा शब्द दिला.
कामगारांच्या कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या मागण्या
१) कंत्राटी कर्मचारी यांना किमान वेतन देण्यात यावे.
२) पी.एफ.(PF),ESIS, भरून त्याचा नंबर / कार्ड देण्यात यावे.
३) कर्मचारी यांचे संपूर्ण वेतन बँक खात्यावर जमा करावे.
४) कंत्राटी कर्मचाऱ्यांना बोनस देण्यात यावा.
५)काम करताना आवश्यक साहित्य देण्यात यावे
६) दर तीन महिन्यातून एकदा आरोग्य तपासणी करण्यात यावी.
७)साप्ताहिक सुट्टी देण्यात यावी.
८) कर्मचाऱ्यांचा आरोग्य विमा उतरविण्यात यावा.
९)ज्या कर्मचाऱ्यांना कामावरून कमी केले आहे.त्यांचे वेतन थकीत आहेत अशा कर्मचाऱ्यांना तत्काळ वेतन देण्यात यावे.
१०)कर्मचाऱ्यांना ओळख पत्र द्यावे.
बारामती स्वच्छ करणारे स्वच्छतादूत कंत्राटी कर्मचारी यांना काम करताना या सर्व गोष्टी मिळणे गरजेचे आहे.महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री मा.अजितदादा पवार मोठ्या प्रमाणावर बारामतीत विकास कामे करीत आहेत.याच विकासकामांची देखभाल स्वच्छता करण्यासाठी व इतर कामासाठी कंत्राटी कर्मचारी यांची आवश्यकता आहे म्हणून बारामती नगर परिषदेच्या वेगवेगळ्या विभागात कंत्राटी कर्मचारी नियुक्त आहेत.
सदर कर्मचाऱ्यांच्या मागण्यांची तत्काळ दखल घेऊन त्यांना प्रशासनाने न्याय दिला पाहिजे.तसेच
कंत्राटी कर्मचारी यांनी आपल्या मागण्या प्रशासनासमोर मांडणे हा त्यांचा संविधानिक अधिकार आहे. असा पत्र व्यवहार केला तरी त्यांना विनाकारण कामावरून काढले जाते.तरी अशा पद्धतीने कर्मचाऱ्यांवर अन्याय होऊ नये याची प्रशासनाने दक्षता घ्यावी .तसेच सदर निवेदनावर येत्या आठ दिवसात कारवाई झाली नाही तर भारतीय युवा पँथर संघटना बारामती नगर परिषद समोर आंदोलन करणार आहे अशी माहिती भारतीय युवा पँथर संघटनेचे संस्थापक अध्यक्ष गौरव अहिवळे यांनी दिली.
यावेळी कंत्राटी कर्मचारी प्रतिनिधी आकाश शिंदे,विजय म्हस्के,ऋषी तोरणे,महेश चव्हाण,विशाल जगताप,योगेश तोरणे,निखिल सरोदे, प्रशांत शेलार,शंकर शिंदे,संतोष भट व संघटनेचे सदस्य योगेश महाडिक,अमोल पाथरकर,पत्रकार अमित बगाडे,शेखर गोरे बारामती शहराध्यक्ष राष्ट्रीय समाज पक्ष उपस्थित होते.
No comments:
Post a Comment