बिरजू मांढरे यांच्या वतीने सलग १४ वा श्री साई पालखी सोहळा . - vadgrasta

Breaking

Post Top Ad

Friday, October 24, 2025

बिरजू मांढरे यांच्या वतीने सलग १४ वा श्री साई पालखी सोहळा .

बिरजू मांढरे यांच्या वतीने सलग १४ वा श्री साई पालखी सोहळा .
व्यसन मुक्ती पथनाट्य,भगवान शंकर यांची वेशभूषा करून तांडव नृत्य,नरसिंह,बालाजी व कोल्हापूर देवीचे खास आकर्षण 

बारामती:-श्रद्धा,सबुरी आणि सबका मलिक एक हे या साईबाबांच्या विचारांचा प्रचार व प्रसार करीत,व्यसन मुक्ती ,वृक्षारोपण,रक्तदान शिबिर च्या माध्यमातून सलग १४ वर्षे बारामती ते शिर्डी पायी पालखी सोहळा काढून सातत्य ठेवून असंख्य साई भक्त जोडणारा मा.उपनगराध्यक्ष बिरजू मांढरे यांचा साई पालखी सोहळ्यास शुक्रवार दि.२४ ऑक्टोम्बर रोजी शुभारंभ करण्यात आला.
या प्रसंगी मा. ज्येष्ठ नगरसेवक किरण गुजर, मा. नगराध्यक्ष सुभाष सोमाणी, भारती मुथा व शुभम ठोंबरे, अजीज शेख, डॉ सौरभ मुथा,सुधीर पानसरे,पत्रकार संतोष जाधव, सुनील शिंदे, सतीश खुडे , प्रमोद डिंबळे,धनंजय तेलंगे, शिर्डी चे पै. मदन मोकाटे, रामभाऊ सोनवणे, अनिल आलवणे, बाबूशेठ व इतर मान्यवर  होते.
केवळ निवडणूक डोळ्यासमोर न ठेवता सातत्य ठेवत साई बाबांच्या विचारांचा आदर करत डॉ.बाबासाहेब आंबेडकर वसाहत उभारणी व इतर 
समाजउपयोगी कार्य केल्याने खरे साई सेवक असल्याचे बिरजू मांढरे यांनी दाखवून दिल्याचे किरण गुजर यांनी सांगितले.
विद्यार्थ्यांना शैक्षणिक मदत, व्यसन मुक्ती,डॉ.बाबासाहेब आंबेडकर वसाहत मधील नागरिकांना विविध मदत केल्यानेच बिरजू मांढरे साई विचारांचे पाईक असल्याचे भारती मुथा यांनी सांगितले

बारामती च्या इतिहासात नोंद घ्यावी असा पायी पालखी सोहळा घेण्याचे श्रेय बिरजू मांढरे यांना जात असल्याचे सुभाष सोमानी यांनी सांगितले.
सर्व धर्म ,जात,पंथ यातील सर्वांना एकत्र करून अध्यात्मिक आनंद व संतुष्टता  देण्याचे काम बारामती ते शिर्डी पायी पालखी सोहळा मध्ये होत असल्याचे प्रास्ताविक मध्ये बिरजू मांढरे यांनी सांगितले.
ड्रीम ऑफ ड्रामा च्या विद्यार्थ्यांनी पथनाट्यातून व्यसनमुक्तीचा संदेश दिला , हिंदू राजा महाकाल ग्रुप यांनी भगवान शंकर यांची वेशभूषा करून तांडव नृत्य सादर केले आणि जय भवानी मंडळी कोल्हापूर यांनी बालाजी भगवान आणि कोल्हापूरच्या देवीची आकर्षक वेशभूषा केली व सहकारी यांनी  संबळ नृत्य सादर केले. 
साईच्छा सेवा ट्रस्ट, बीएम ग्रुप,वस्ताद लहुजी साळवे दहीहंडी मंडळ, कै भाऊसाहेब मांढरे मित्र परिवार,श्रीहरी भाऊ तेलंगे मंडळ, जय भवानी मित्र मंडळ यांनी उपस्थितांचे स्वागत केले तर सुत्रसंचालन सावळेपाटील यांनी केले व आभार राजू मांढरे यांनी मानले.

No comments:

Post a Comment