पत्नीच्या विवाह बाह्य प्रेमसंबंधामुळे झाला होता खून,अखेर मृतदेहाचे हातावरील गोंदणाने घटनेला फोडली वाचा; खूनाचा गुन्हा उघडकीस.. बारामती/भिगवण:-बारामतीतील कटफळ येथील पत्नीच्या विवाह बाह्य प्रेमसंबंधामुळे पती-पत्नीमधील वाद टोकाला गेला, रागाचे भरात पतीने पत्नीचे डोक्यात लोखंडाने
मारून तिचा खून केला आणि पुरावा नष्ट करणेसाठी मृतदेह ओढयाचे पुलाखाली फेकून दिला. अखेर मृतदेहाचे गोंदणाने घटनेला वाचा फोडली व खूनाचा गुन्हा उघडकीस आणून आरोपीस चोवीस तासांचे आत अटक करणेत आली.
स्थानिक गुन्हे शाखा व भिगवण पोलीस स्टेशन, पुणे ग्रामीण ची कामागिरी दिसून आली,भिगवण पोलीस स्टेशन गु.र.नं. २६४ / २०२५ भा.न्या.सं.क १०३(१), २३८ प्रमाणे दि. २२/१०/२०२५ रोजी गुन्हा दाखल आहे,
भिगवण ते बारामती जाणारे रोडला मदनवाडी गावचे हद्दीत देवकातेवस्तीतील ओढयाचे पुलाखाली ब्लॅकेटमध्ये काहीतरी बांधून ठेवले
असल्याची माहिती मिळाल्यावरून मदनवाडी गावचे पोलीस पाटील नानासाहेब वणवे यांनी पोलीसांना बोलावून घेवून खातरजमा करता,
काळे रंगाचे ब्लॅकेट मध्ये बांधलेला एका महिलेचा मृतदेह अंदाजे वय ३०-३५ वर्षे दि २२/१०/२०२५ रोजी १७/३० वा सास मिळून
आला. मृतदेह कुजलेले स्थितीत होता, तसेच डोक्याची कवटी फुटलेली होती, हातावर Raviraj असे गोंदण होते, अनोळखी महिलेचा
कोणीतरी अज्ञात व्यक्तीने अज्ञात कारणासाठी खून करून पुरावा नष्ट करणेकरीता मृतदेह ब्लँकेटमध्ये बांधून ओढयाचे पुलाखाली फेकून
दिला असल्याने सदर घटनेबाबत नानासाहेब हनुमंत वणवे वय ४४ वर्षे, व्यवसाय पोलीस पाटील रा. मदनवाडी, ता. इंदापूर जि पुणे
यांनी फिर्याद नोंदविली आहे.
एंका महिलेचा खून करून पुरावा नष्ट करणेकरीता तिचा मृतदेह ब्लॅकेट मध्ये बांधून फेकून देण्यात आला होता, गुन्हयाचे
गांभीर्य लक्षात घेवून मा. पोलीस अधीक्षक पुणे ग्रामीण, यांनी घटनास्थळी भेट दिली. घटनेची सविस्तर माहिती घेवनू मा. विशेष
पोलीस महानिरीक्षक, श्री. सुनिल फुलारी . कोल्हापूर परिक्षेत्र, कोल्हापूर यांना कळविणेत आले. त्यांनी केलेल्या सुचना व
मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखा व भिगवण पोलीस स्टेशन कडील अधिकारी व अंमलदार यांची तीन पथके तयार करणेत आली.
मृतदेह हा कुजलेले स्थितीत मिळाला होता, त्यामुळे मृतदेह हा अंदाजे सात-आठ दिवसांपूर्वीचा असण्याची शक्यता निर्माण झाली.
त्यामुळे तपास पथकांनी मयताचे फोटो हस्तगत केले, मयताचे हातावरील Raviraj नावाचे गोंदणाचा फोटो घेण्यात आला. पथकाने
गोपनीय बातमीदार तसेच आजुबाजूचे परिसरातील नागरीक, बारामती विभागातील पोलीस स्टेशनचे अधिकारी अंमलदार यांना मयताची
ओळख पटविणेसाठी फोटो पाठविणेत आले होते.
तपास पथकाचे वतीने मयताची ओळख पटविण्याचा प्रयत्न सुरू असताना गोपनीय माहिती मिळाली की, गोंदण असलेला
मृतदेह हा दिपाली सुदर्शन जाधव रा. कटफळ ता. बारामती जि पुणे यांचा असण्याची शक्यता आहे. त्यांचे हातातवर Raviraj नावाचे
गोंदण आहे. अशी माहिती मिळाल्याने पथकाने संशयित महिलेचा शोध घेतला असता, सदर महिलेचा पती सुदर्शन ऊर्फ रविराज रणजित
जाधव वय ३६ वर्षे, रा. कटफळ ता. बारामती जि पुणे याने त्याची पत्नी दिपाली सुदर्शन जाधव ही मिसींग झाले बाबत दि.
१४/१०/२०२५ रोजी बारामती तालुका पोलीस स्टेशन येथे तक्रार नोंदविली आहे. मृतदेहाचे हातावरील गोंदण हे सुदर्शन ऊर्फ रविराज
रणजित जाधव याने ओळखले असून मृतदेह हा त्याचेच पत्नीचा असल्याचे सांगितले.
सुदर्शन ऊर्फ रविराज रणजित जाधव याचेकडे करणेत आलेल्या तपासामध्ये तपास पथकास विसंगती आढळून आली, त्यामुळे
त्याचेवर संशय बळावल्यामुळे त्यास विश्वासात घेवून चौकशी केली असता, मयत महिला दिपाली सुदर्शन जाधव वय ३० वर्षे रा.
कटफळ ता. बारामती जि पुणे हिचे विवाहबाहय प्रेमसंबंध असल्याचा संशय त्यास होता, मयत महिला ही गर्भवती असल्याने तिचे
पोटातील बाळावरून सुदर्शन जाधव व दिपाली जाधव यांचेत दि. १२/१०/२०२५ रोजी सकाळी ०९/०० वा सुतास राहते घरी कटफळ
येथे भांडण झाले, विवाहबाह्य प्रेमसंबंधाचा संशय घेवून रागाचे भरात सुदर्शन जाधव याने पत्नी दिपाली जाधव हिचे डोक्यात लोखंडी
वस्तूने मारहाण केली व तिचा खून केला आणि पुरावा नष्ट करण्याकरीता तिचा मृतदेह ब्लॅकेट मध्ये गुंडाळून बांधून त्याचेकडील
ज्युपीटर मोटार सायकलवर समोर ठेवून मदनवाडी येथील भिगवण-बारामती रोडवरील ओढयाचे पुलाखाली फेकून दिला असल्याचे
सांगितले. आरोपी सुदर्शन ऊर्फ रविराज रणजित जाधव वय ३६ वर्षे, रा. कटफळ ता. बारामती जि पुणे याची पोलीस कोठडी रिमांड
मिळणेकामी त्यास मा. न्यायालयात हजर केले असता, दि. ३१/१०/२०२५ पर्यंत पोलीस कोठडी मंजूर करणेत आली आहे.
सदरची कामगिरी मा. विशेष पोलीस महानिरीक्षक, श्री सुनिल फुलारी , कोल्हापूर परिक्षेत्र कोल्हापूर यांचे
मार्गदर्शनाखाली, मा. पोलीस अधीक्षक श्री. संदीप सिंह गिल्ल. पुणे ग्रामीण, मा. अपर पोलीस अधीक्षक श्री. गणेश बिरादार,
बारामती विभाग, मा. उपविभागीय पोलीस अधिकारी श्री मधुकर भट्टे, बारामती उपविभाग, यांचे सुचनांप्रमाणे स्थानिक गुन्हे शाखेचे
पोलीस निरीक्षक अविनाश शिळीमकर, भिगवण पो स्टे चे स.पो.नि. विनोद महांगडे, स्था. गु. शा. चे सपोनि. कुलदीप संकपाळ, श्रेणी
पोसई बाळासाहेब कारंडे, स्था.गु.शा. चे अंमलदार अभिजीत एकशिंगे, स्वप्निल अहीवळे, अतुल डेरे, ज्ञानेश्वर क्षिरसागर, अजय घुले,
निलेश शिंदे, अजय देडे, भिगवण पो स्टे चे अंमलदार सचिन पवार, महेश उगले, रामदास करचे, संतोष मखरे, गणेश करचे, आप्पा
भांडवलकर, रणजित मुळीक, मयुर बोबडे, विठ्ठल वारघड, वर्षा जामदार, पो पाटील शामल पवार,कविता माने यांनी केली असून पुढील तपास भिगवण पोलीस स्टेशन करत आहेत.
No comments:
Post a Comment