धक्कादायक..महिला डॉक्टरची आत्महत्या;हातावर सुसाईड नोट,दोन पोलिसांवर अत्याचाराचे आरोप… - vadgrasta

Breaking

Post Top Ad

Friday, October 24, 2025

धक्कादायक..महिला डॉक्टरची आत्महत्या;हातावर सुसाईड नोट,दोन पोलिसांवर अत्याचाराचे आरोप…

धक्कादायक..महिला डॉक्टरची आत्महत्या;हातावर सुसाईड नोट,दोन पोलिसांवर अत्याचाराचे आरोप…
फलटण:- सातारा जिल्ह्यातील फलटण शहरात एका महिला डॉक्टरने आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. उपजिल्हा रुग्णालयात कार्यरत असलेल्या डॉ. संपदा मुंडे या तरुण डॉक्टरने हॉटेलच्या खोलीत गळफास लावून आयुष्य संपवलं. या घटनेने केवळ फलटण नव्हे तर संपूर्ण जिल्हा हादरला आहे. विशेष म्हणजे, मृत्यूपूर्वी डॉक्टरने हातावरच सुसाईड नोट लिहून दोन पोलिस अधिकाऱ्यांवर गंभीर आरोप केले आहेत.मिळालेल्या माहितीनुसार, डॉ. मुंडे यांनी आपल्या हातावर लिहिलेल्या नोटमध्ये PSI आणि पोलीस या दोघांना आपल्या मृत्यूला जबाबदार ठरवलं आहे. त्याचबरोबर या दोघांनी स्वतःवर “अत्याचार आणि मानसिक छळ” केल्याचा उल्लेख त्यांनी केला आहे. त्यामुळे या घटनेनंतर पोलिस दलात मोठी खळबळ उडाली आहे.दरम्यान, प्राथमिक तपासात समोर आलं आहे की, गेल्या काही महिन्यांपासून डॉ. मुंडे आणि पोलिस विभागातील काही कर्मचाऱ्यांमध्ये वाद सुरू होता. एका वैद्यकीय तपासणी प्रकरणात झालेल्या गैरसमजामुळे त्यांच्यावर अंतर्गत चौकशीही सुरू होती. या सततच्या ताणतणावामुळे आणि छळामुळे त्यांनी टोकाचे पाऊल उचलल्याचा अंदाज पोलिसांकडून व्यक्त केला जात आहे.घटनेची माहिती मिळताच फलटण पोलिसांनी हॉटेल गाठून पंचनामा केला आणि मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवला. तसेच, डॉ. मुंडे यांच्या सुसाईड नोटमधील उल्लेखानुसार आरोपी पोलिसांविरोधात तपास सुरू करण्यात आला आहे. जिल्हा पोलीस अधीक्षकांच्या मार्गदर्शनाखाली स्वतंत्र चौकशीची प्रक्रिया सुरू करण्यात आली असून,दरम्यान, एका तरुण महिला डॉक्टरने पोलिसांवर छळ आणि अत्याचाराचे आरोप करत आत्महत्या केल्याने वैद्यकीय क्षेत्रात तीव्र संतापाची लाट उसळली असून महाराष्ट्रात खळबळ माजली आहे.

No comments:

Post a Comment