धक्कादायक..बारामतीत लग्नाचे खोटे आमिष दाखवून १३ वर्षीय अल्पवयीन मुलीवर केला बलात्कार.. बारामती:- बारामती शहरात पुन्हा एकदा
धक्कादायक प्रकार समोर आला आहे. एका युवकाने १३ वर्षीय अल्पवयीन मुलीशी
लग्नाचे खोटे आमिष दाखवून वारंवार बलात्कार
केल्याचे उघड झाले आहे. या प्रकरणी बारामती
शहर पोलिस ठाण्यात बाल लैंगिक अत्याचार
प्रतिबंधक कायदा (POCSO Act), बलात्कार व
फसवणुकीचे कलमांसह गुन्हा दाखल करण्यात
आला आहे. या संदर्भात पीडित मुलीच्या आईने फिर्याद दिली असून, मिळालेल्या माहितीनुसार एप्रिल २०२५ पासून ते १७ ऑक्टोबर २०२५ या कालावधीत आरोपीने इंस्टाग्रामच्या माध्यमातून अल्पवयीन मुलीशी संपर्क साधला. सुरुवातीला तो तिच्याशी मैत्री करीत तिला चॉकलेट आणि विविध गिफ्ट देत विश्वास संपादन करू लागला. त्यानंतर वारंवार भेटी घेत तो तिला लग्नाचे खोटे आश्वासन देत जवळीक साधू लागला.यानंतर आरोपीने बारामती तालुक्यातील पिडितेच्या राहत्या घरी आणि घराशेजारील शेडजवळ तिच्यावर जबरदस्तीने वारंवार बलात्कार
केल्याचे फिर्यादीत नमूद आहे. विशेष म्हणजे,
पिडित मुलगी ही केवळ १३ वर्षांची असून ती
मागासवर्गीय समाजातील आहे. हे माहित
असतानाही आरोपीने तिच्याशी अशा प्रकारे वर्तन
केल्याने गंभीर स्वरूपाचा गुन्हा नोंदविण्यात आला आहे.बारामती शहर पोलिस ठाण्यात या प्रकरणी लैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायदा (POCSO).भारतीय दंड संहितेतील बलात्कार, फसवणूक आणि लग्नाचे खोटे आमिष दाखविल्याचे कलमांसह गुन्हा दाखल करण्यात आला आहे.पुढील तपास पोलिस निरीक्षकांच्या
मार्गदर्शनाखाली सुरु आहे. या घटनेमुळे बारामती
परिसरात संतापाची लाट असून,समाजातील
विविध घटकांकडून आरोपीवर कठोर कारवाईची
मागणी होत आहे.
No comments:
Post a Comment