भिगवण:-पुणे जिल्ह्यातील इंदापूर तालुक्यातील भिगवण येथील मदनवाडी गावाच्या हद्दीत पुलाखालील पाण्यात एका महिलेचा मृतदेह कुजलेल्या अवस्थेत आढळून आला आहे. हा मृतदेह चादरीत गुंडाळलेल्या अवस्थेत आढळून
आला असून, मृत महिला अंदाजे २५ ते ३० वर्षांची असल्याचा अंदाज वर्तविला जातोय. मृत महिलेच्या डाव्या हातावर रविराज नावाचा टॅटू असून या मृत महिलेची ओळख अद्याप पटली नसून तिचा खून कोणी आणि का केला याचा सखोल तपास भिगवण पोलिस करत आहेत.महत्वाचा बाब म्हणजे ही महिला सहा
ते सात महिन्यांची गरोदर असल्याची माहिती समोर येत आहे.हा प्रकार बारामती भिगवण राज्य मार्गावरील मदनवाडी पुलाखाली आढळून आल्याने उघडकीस आला. पोलिसांच्या प्राथमिक तपासानुसार, ही महिला अंदाजे सहा ते सात महिन्यांची गर्भवती होती. घटनेची माहिती मिळताच भिगवण पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली आणि पंचनामा करून मृतदेह ताब्यात घेतला.यादरम्यान परिसरातील
नागरिकांची मोठी गर्दी जमली होती.तपासात असे दिसून आले की, मृतदेहाला सुमारे पाच ते सहा दिवस झाले असावेत.मृतदेह पूर्णपणे कुजलेल्या अवस्थेत असल्यामुळे ओळख पटवण्यात पोलिसांना अडचणी येत आहेत.प्राथमिक अंदाजानुसार, हा खुनाचा प्रकार असल्याचे पोलिसांनी सांगितले आहे.तिचा खून करून मृतदेह येथे आणून टाकण्यात आल्याचा संशय आहे. भिगवण पोलिस या घटनेचा सखोल तपास करत असून,आसपासच्या परिसरातील सीसीटीव्ही फुटेज, हरवलेल्या महिलांच्या तक्रारी आणि मोबाईल लोकेशन यांची तपासणी सुरू आहे.या महिलेची ओळख पटवणे हे सध्या पोलिसांसाठी सर्वात मोठे आव्हान ठरले आहे.ओळख पटल्यानंतर या खुनामागील कारणांचा आणि आरोपींचा शोध घेणे सुलभ होईल,अशी माहिती पोलिसांनी दिली.
No comments:
Post a Comment