'कलम झुकत नाही,सत्य थांबत नाही..!' - पत्रकार दिनी बारामतीतील पत्रकारांचा जाहीर सन्मान व सत्कार.. बारामती:- दर्पणकार बाळशास्त्री जांभेकर यांच्या जयंतीनिमित्त साजऱ्या होणाऱ्या मराठी
पत्रकार दिनाचे औचित्य साधत बारामती व तालुक्यातील विविध पत्रकार संघ व पत्रकार यांचा सन्मान पिडीसी बँकेचे संचालक व जेष्ठ नेते संभाजी नाना होळकर व बारामती नगर परिषद व नगराध्यक्ष सचिन सातव व सर्व नगरसेवक यांच्या वतीने तसेच बारामती शहर पोलीस स्टेशनच्या वतीने पत्रकार दिनी सन्मान सोहळा दिमाखात पार पडला.लोकशाहीचा चौथा स्तंभ अधिक बळकट करणाऱ्या, सत्यासाठी झगडणाऱ्या आणि अन्यायाविरोधात आवाज उठवणाऱ्या
पत्रकारांचा यावेळी जाहीर गौरव करण्यात
आला. या सोहळ्यात प्रांत अधिकारी वैभव नावडकर,तहसीलदार रावडे, मुख्याधिकारी पंकज भुसे यांच्या हस्ते पत्रकार बांधवांचा सन्मान करण्यात आला यावेळी विविध ठिकाणी झालेल्या सत्कार व सन्मान सोहळ्यास मोठ्या संख्येने प्रिंट मीडिया, इलेक्ट्रॉनिक मीडिया, सोशल मीडिया चे पत्रकार उपस्थित होते,बारामतीत मोठया संख्येने पत्रकार पाहिल्यादाच उपस्थित होते हे सर्व एकत्र करण्यात संभाजी नाना होळकर यांनी चांगले नियोजन केले त्याबद्दल त्यांचे कौतुक करण्यात आले.यावेळी पत्रकार भवन व घरकुल योजने संदर्भात आवर्जून उल्लेख करून पत्रकार बांधवांनी मागणी केली ती मागणी लवकरच उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्याकडे बोलून पत्रकार भवन उभा केले जाईल असे आश्वासन नगराध्यक्ष सचिन सातव यांनी दिले.
No comments:
Post a Comment