कारभारी आण्णा चॅरिटेबल फाऊंडेशन प्रायमरी स्कूल बारामती विद्यालयात कै. धोंडीबा आबाजी सातव (कारभारी आण्णा) यांची पुण्यतिथी उत्साहात साजरी..
बारामती:- सोमवार दिनांक ०५ जानेवारी २०२६ रोजी कारभारी आण्णा चॅरिटेबल
फाऊंडेशन प्रायमरी स्कूल बारामती विद्यालयात कै. धोंडीबा आबाजी सातव (कारभारी
आण्णा) यांची पुण्यतिथी मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. या प्रसंगी संस्थेच्या
विश्वस्त श्रीमती कांता (काकी) सातव, संस्थेचे सचिव श्री. प्रशांत (नाना) सातव,
विश्वस्त सौ. शुभांगी (वहिनी) सातव, ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते श्री. रमेश (भाऊ)
जाधव,
विद्यालयाच्या मुख्याध्यापिका सौ. जया शर्मा व सौ. सुनिता शेडगे उपस्थित
होते. प्रमुख मान्यवराच्या शुभहस्ते कारभारी आण्णांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून
प्रतिमापूजन व दीपप्रज्वलन करण्यात आले.
ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते श्री. रमेश (भाऊ) जाधव यांनी आपल्या
मनोगतातून कारभारी आण्णांच्या जीवन कार्यावर प्रकाश टाकला - कारभारी आण्णा हे
केवळ नाव नव्हे, तर लोकहिताचे ध्येय असलेले व्यक्तिमत्त्व होते. शिस्त, प्रामाणिकपणा,
परिश्रम आणि लोकांवरील प्रेम ही त्यांची खरी संपत्ती होती. ते बारामती नगरीचे वीस
वर्षाहून अधिक काळ नगराध्यक्ष आणि जवळपास ४० वर्ष बारामती नगरपालिकेचे
नगरसेवक होते. या नगरीची जडणघडण आणि विकास करण्यामध्ये त्यांचा मोलाचा
वाटा आहे. त्यांच्या स्मृतीप्रित्यर्थ व कार्याची आठवण चिरंतन राहावी म्हणून कारभारी
आण्णा चॅरिटेबल फाउंडेशनची स्थापना करण्यात आली असून संस्थेचे सचिव श्री. प्रशांत
(नाना) सातव यांनी कारभारी आण्णांच्या कार्यापासून सर्वानी प्रेरणा घेण्याचे आवाहन
केले.कारभारी आण्णांच्या जीवनावर आधारित भावस्पर्शी गीतांच्या माध्यमातून प्रभावी संदेश देत उपस्थितांना मंत्रमुग्ध केले. त्यांच्या स्मृतींना विनम्र
अभिवादन करून, वृक्षारोपण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमाला
विद्यालयातील सर्व शिक्षक वृंद, शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने
उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आणि आभार विद्यालयाच्या शिक्षिका सौ.
आरती जाधव यांनी केले.
No comments:
Post a Comment