श्रायबर डायनामिक्स डेअरीज एम्प्लॉइज युनियनच्या निवडणूकीत कामगार विकास पॅनल विजयी.. बारामती:- श्रायबर डायनामिक्स डेअरीज एम्प्लॉइज युनियनचे पदाधिकारी निवडणुक दिनांक 03/01/2026 रोजी पार पडली, युनियन चे संस्थापक अध्यक्ष श्री पांडुरंग (मामा) कचरे यांचे नेतृत्वात कामगार विकास पॅनल चे सर्व उमेदवार मोठ्या मताधिक्याने विजयी झाले .
1.विजय महादेव सस्ते -अध्यक्ष
2. गणेश शंकर सोनवणे- कार्याध्यक्ष
3. मयूर मिनिनाथ शिंदे - उपाध्यक्ष
4. राजेंद्र तुकाराम कोळेकर- सरचिटणीस
5. गोकुळ वाल्मिक मदने - सह चिटणीस
6. दादराम मुंजाबा पोंदकुले - सह चिटणीस
7. राजेंद्र भानुदास तरंगे - कोषपाल
8. अनिल भालेराव पवार - सह कोषपाल
या पदावर वरील उमेदवार मोठ्या फरकाने निवडून आले.
युनियन चे अध्यक्ष विजय सस्ते व सर्व उमेदवार यांनी कामगारांचे आभार व्यक्त केले.
अनेक अडचणीवर मात करून कामगारांनी या पॅनल वर जो विश्वास व्यक्त केला आहे त्यास कोणताही तडा जाऊ दिला जाणार नाही.
भयमुक्त वातारणात विकासाचा नवा अध्याय सुरू करून कंपनी व कामगारांचे हित साध्य करणे साठी सर्वांचे सहकार्याने काम करू
कोणत्याही कामगारांवर अन्याय होणार नाही निवडून आलेले उमेदवार कामगारांना दैवत म्हणून काम करतील आपला परका न मानता सर्व कामगारांना बरोबर काम करतील सर्व कामगार बंधू यांनी अत्यंत मोठी जबाबदारी दिली आहे पूर्ण क्षमतेने पार पाडू असे श्री पांडुरंग कचरे यांनी सर्वांना आश्र्वासित केले.
No comments:
Post a Comment