बारामतीत जनशक्ती कंत्राटी कामगार संघ पदनियुक्ती कार्यक्रम संपन्न..
बारामती : बारामती येथे जनशक्ती कंत्राटी कामगार संघाचा पदनियुक्ती कार्यक्रम संस्थापक अध्यक्ष गौरव अहिवळे यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाला.बारामती शहर अध्यक्ष पदी आकाश शिंदे,उपाध्यक्ष पदी विजय म्हस्के, कार्याध्यक्ष पदी निखिल सरोदे,सरचिटणीस सुरज वाडेकर , संघटक ऋषिकेश तोरणे,सहकार्याध्यक्ष अनिकेत धालपे ,संपर्कप्रमुख योगेश तोरणे, सह संघटक ओम शिंदे पदी यांची नियुक्ती करण्यात आली.
यावेळी कामगार संघाचे संस्थापक अध्यक्ष गौरव अहिवळे यांनी सांगितले की भारतीय संविधानाने प्रत्येक नागरिकाला संघटन करण्याचा अधिकार दिला आहे.कामगारांच्या हक्क अधिकारासाठी आम्ही संघटित होऊन लढणार आहे. कंत्राटी कामगारांसाठी कायम लढत राहणार आहे.
जनशक्ती कामगार संघाचे बारामती शहर अध्यक्ष आकाश शिंदे यांनी यावेळी बोलताना सांगितले की आमच्या हक्कासाठी गौरव अहिवळे लढत आहेत आम्ही कामगार त्यांच्यासोबत कायम आहोत.तसेच मला दिलेली अध्यक्ष पदाची जबाबदारी मी निष्ठेने पार पाडणार.
कामगार संघ सदस्य मारुती सोनवणे, मनोज खरात,अक्षय सरोदे यांनी यांनी कार्यक्रमाचे नियोजन केले होते.
मनोज लोंढे यांनी कार्यक्रमाला उपस्थित सर्वांचे आभार मानले.
No comments:
Post a Comment