बारामतीत राष्ट्रीय रस्ता सुरक्षा अभियान,२०२६ अंतर्गत प्रबोधन.. बारामती:- राष्ट्रीय रस्ता सुरक्षा अभियान, २०२६ अंतर्गत आज दिनांक ०१.०१.२०२६ रोजी उप
प्रादेशिक परिवहन कार्यालय, बारामती आणि शिवनगर विदया प्रसारक मंडळ माळेगांव बु यांचे
संयुक्त विदयमानाने माळेगांव बु येथील शरद सभागृहामध्ये उदघाटन समारंभाचे आयोजन करण्यात आले.सदर उदघाटन समारंभापूर्वी सकाळी १०.०० वाजता रस्ता सुरक्षा प्रबोधनपर बाईक रॅलीचे आयोजन करण्यात आले. ही रॅली शिवनगर विदया प्रसारक मंडळ कॅम्पस माळेगांव नगरपंचायत वेस शिवनगर विदया प्रसारक मंडळ कॅम्पस या मार्गे काढण्यात आली व या रॅलीमध्ये मोठया प्रमाणावर महिला वर्ग सहभागी झाला.
उदघाटन कार्यक्रमाची सुरुवात सकाळी ११.०० वाजता रस्ता सुरक्षाविषयक पथनाटयाचे
आयोजन करुन करण्यात आली या पथनाटयामध्ये शिवनगर विदया प्रसारक मंडळ माळेगांव बु यांचे डिप्लोमा महाविदयालयातील विदयार्थ्यांनी सहभाग नोंदविला. यामध्ये वाहतूकीचे नियम पाळणे, हेल्मेट परिधान करणे, सीट बेल्ट लावणे, मदयपान न करता वाहन चालविणे व अपघात झाल्यानंतर गोल्डन अवर्स मध्ये अपघात ग्रस्ताला मदत करणे हे मुददे प्रभावीपणे मांडून सर्वांना याबाबत महत्वपूर्ण मार्गदर्शन केले. त्यानंतर कार्यक्रमाचे प्रमुख पाहुण्यांचे स्वागत करण्यात आले व त्यांचे हस्ते दिपप्रज्वलनाने कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. दिपप्रज्वलानानंतर कार्यक्रमाच्या स्टेजवरुन प्रमुख मान्यवरांच्या हस्ते रस्ता सुरक्षा विषयक मार्गदर्शक पुस्तीकेचे विमोचन करण्यात आले.कार्यक्रमाची प्रस्तावना श्री. धनंजय ठोंबरे, सचिव शिवनगर विदया प्रसारक मंडळ माळेगांव
बु यांनी केली त्यामध्ये त्यांनी रस्ते वाहतुकीचे नियम पाळणे व शिस्त किती महत्वाची आहे
याबाबत आपले मत व्यक्त केले.प्रस्तावना झाल्यानंतर कार्यक्रमासाठी उपस्थित असणारे चांडाळ चौकडी या वेबसिरीज मधी मुख्य कलाकार रामभाउ जगताप व भरत शिंदे यांनीही रस्ता सुरक्षा व त्याबाबतचे नियम याबाबत
आपले मनोगत व्यक्त केले.कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे व उप प्रादेशिक परिवहन अधिकारी श्री. सुरेंद्र निकम यांनी रस्ता सुरक्षा ही प्रमुख ४ भागांमध्ये विभागली जाते तसेच वाहन चालवताना डिफेन्स ड्रायव्हींग करण्याचे
महत्व सांगीतले. अपघात झाल्यानंतर पहिल्या एक तासामध्ये म्हणजेच गोल्डन अवर्स मध्ये मदत
करणा-या व्यक्तीला जीवनदूत म्हणतात तसेच गुड समेटीरीयन म्हणून अशा व्यक्तीचा
शासनाकडून सत्कार करण्यात येतो याबाबतचे महत्व अधोरेखीत केले. प्रत्येक व्यक्तीने पोस्ट
विभागाकडून वार्षिक रुपये ५५० चे विमा कवच घेतल्यास अपघातामध्ये मृत्यू झाल्या अशा
व्यक्तीला १० लाख रुपये मिळू शकतात याचे महत्व समजावून सांगीतले. तसेच उप प्रादेशिक
परिवहन कार्यालय, बारामती कार्यालयाकडून मागील वर्षी एकूण अपघातामध्ये १५ टक्के तर
मृत्युमध्ये ८ टक्के एवढी घट करण्यात कार्यालयास यश प्राप्त झाले असल्याची माहिती दिली व आपले अमुल्य मार्गदर्शन केले.
सदर कार्यक्रमाचे मार्गदर्शक व सेवानिवृत्त मोटार वाहन निरिक्षक श्री. अनिल पंतोजी यांनी
रस्ता ओलांडताना तोंड पुढे व हात समोर हा नियम असल्याचे सांगून नेहमी रस्त्याच्या उजव्या
बाजूने चालणेबाबत सांगीतले. दुचाकी चालविताना लहान मूल असले तर वाहनाचा वेग नेहमी ४० कि.मी. पेक्षा कमी असावा तसेच वाहतूकीचे नियम न पाळल्यास चालकाचा वाहन परवाना कमीत कमी तीन महिन्यांसाठी निलंबीत होतो याबाबतची माहिती दिली. बस, टक यासारख्या मोठया वाहनांच्या ब्लाईट स्पॉट मध्ये आल्याने मोठया प्रमाणावर अपघात होत असल्याचीही माहिती दिली व रस्ता सुरक्षेबाबत महत्वाचे मार्गदर्शन केले.कार्यक्रमाच्या समारोपामध्ये श्री. संदीप शहा, प्राचार्य शिवनगर विदया प्रसारक मंडळ माळेगांव बु सर्व प्रमुख मान्यवरांचे आभार मानले व कार्यक्रमाची यशस्वी सांगता झाल्याचे जाहीर केले.या कार्यक्रमासाठी कार्यालयातील श्री. निरंजन पुनसे, श्री. पदमाकर भालेकर, श्री. बजरंग कोरवले, श्री. नितिन घोडके, श्री. राजकुमार नरसगोंडे, मोटार वाहन निरिक्षक व श्री. सूरज पाटील,श्री. मोहन भापकर, श्री. संजय भापकर, श्री. सागर ठेंगील, श्री. कुणाल राजदीप, श्री. रजत काटवटे, श्रीमती प्रज्ञा ओमासे, श्रीमती हेमलता मुळीक, श्रीमती प्रियांका सस्ते, समोवानि तसेच कर्मचारी वर्ग उपस्थित होते.
No comments:
Post a Comment