बापरे..महिलेचा खून;अज्ञात आरोपीविरोधात गुन्हा दाखल.. - vadgrasta

Breaking

Post Top Ad

Monday, January 19, 2026

बापरे..महिलेचा खून;अज्ञात आरोपीविरोधात गुन्हा दाखल..

बापरे..महिलेचा खून;अज्ञात आरोपीविरोधात गुन्हा दाखल..
सुपा:-बारामती तालुक्यातील सुपा पोलीस स्टेशन हद्दीत एका अज्ञात महिलेचा खून झाल्याची घटना उघडकीस आली आहे. दिनांक १९ जानेवारी २०२६ रोजी सकाळी ७ वाजण्यापूर्वी, मौजे काळखैरेवाडी गावच्या हद्दीतील खैरेपडळ परिसरात सुपा - शेरेवाडी रोडलगत गट नंबर ११७ मधील शेतजमिनीतील मोकळ्या जागेत ही घटना घडली.अंदाजे २५ ते २७ वर्षे वयाच्या अनोळखी महिलेचा कोणीतरी अज्ञात इसमाने अज्ञात कारणावरून अज्ञात हत्याराने मारहाण करून गंभीर जखमी केले असून त्यात तिचा मृत्यू झाला आहे.या प्रकरणी सुपा पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्टर नंबर १२/२०२६ बी. एन. एस. कलम १०३ (१) अन्वये अज्ञात आरोपी विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.पुढील तपास सपोनि नवसरे, प्रभारी अधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली पोउपनि जिनेश कोळी हे करीत आहेत.

No comments:

Post a Comment