बारामतीत कॅनॉल रस्त्यावर बेकायदेशीर पार्किंगमुळे अपघातांचे प्रमाण वाढले; नागरिकांचे मुख्याधिकाऱ्यांना निवेदन.. - vadgrasta

Breaking

Post Top Ad

Monday, January 19, 2026

बारामतीत कॅनॉल रस्त्यावर बेकायदेशीर पार्किंगमुळे अपघातांचे प्रमाण वाढले; नागरिकांचे मुख्याधिकाऱ्यांना निवेदन..

बारामतीत कॅनॉल रस्त्यावर बेकायदेशीर पार्किंगमुळे अपघातांचे प्रमाण वाढले; नागरिकांचे मुख्याधिकाऱ्यांना निवेदन..
बारामती :- महावीर भवन ते परकाळे बंगला या कॅनॉल रस्त्यावर बेकायदेशीर व नियमबाह्य पार्किंगमुळे अपघातांचे प्रमाण लक्षणीयरीत्या वाढले असून याबाबत स्थानिक नागरिकांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. व्यावसायिक आस्थापना, हॉटेल व्यावसायिक व विविध संस्थांकडून रस्त्यावर बेदरकारपणे वाहने उभी करण्यात येत असल्याने वाहतुकीस मोठा अडथळा निर्माण होत आहे.
या रस्त्यावर हॉटेल महाराजा, गाढवे ननवरे हाइट्स, साकल्प, आदित्य क्लासेस, महाराष्ट्र बँक, जेधे हॉस्पिटल तसेच परकाळे बंगला परिसरातील नवीन बांधकामांमध्ये पुरेशी पार्किंग व्यवस्था नसल्यामुळे ग्राहक व नागरिकांची वाहने थेट रस्त्यावर उभी केली जात आहेत. तसेच व्यावसायिक फलक, अतिक्रमण व नियमांचे उल्लंघन यामुळे अपघातांचे प्रमाण अधिकच् वाढले आहे.
या पार्श्वभूमीवर परिसरातील नागरिकांनी बारामती नगरपालिकेच्या मुख्याधिकाऱ्यांना निवेदन सादर करून सदर रस्त्यावर तातडीने योग्य उपाययोजना राबवाव्यात, बेकायदेशीर पार्किंग व अतिक्रमण करणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई करावी, तसेच वाहतूक सुरळीत होण्यासाठी ठोस नियोजन करावे, अशी मागणी केली आहे.
नागरिकांनी वारंवार तक्रारी करूनही परिस्थितीत सुधारणा न झाल्याने प्रशासनाने तात्काळ लक्ष देऊन कठोर कारवाई करावी, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
 सदर व्यवसायिकांनी पार्किंग केल्यास अपघाताचे प्रमाण निश्चितच कमी होणार असून, ही वैयक्तिक द्वेषापोटी नसून केवळ अपघातांना प्रतिबंध व्हावा म्हणून यासंदर्भातली कार्यवाही व्हावी हीच अपेक्षा व्यक्त होत आहे. *स्थानिक नागरिक - अर्शद दलाईत भोरीचाळ कॅनॉल रोड, बारामती*

No comments:

Post a Comment