विकसित बारामतीत अवैध दारू जोमात.. राज्य उत्पादन शुल्क विभाग कोमात..! - vadgrasta

Breaking

Post Top Ad

Sunday, January 18, 2026

विकसित बारामतीत अवैध दारू जोमात.. राज्य उत्पादन शुल्क विभाग कोमात..!

विकसित बारामतीत अवैध दारू जोमात.. राज्य उत्पादन शुल्क विभाग कोमात..!    बारामती(संतोष जाधव):-महाराष्ट्रात बारामती हे विकसित म्हणून नावाजले जात असले तरी मात्र याठिकाणी अवैध दारू, हातभट्टी मात्र राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या आशीर्वादाने जोरात चालू असल्याचे येथील नागरिक सांगत आहे, अनेक वेळा तक्रारी करूनही बारामतीत अवैध दारू विक्री करणाऱ्या वर कारवाई होत नसल्याने आर्थिक माया एजंट मार्फत  अधिकारी घेत असल्याचे चर्चा रंगत आहे. म्हणूनच की काय बारामती सारख्या विकसित भागात भव्य शासकीय इमारती उभ्या होत असताना प्रशासकीय भवन ही देखील भव्य इमारत उभारली गेली असून या इमारतीत प्रशस्त असे राज्य उत्पादन शुल्क विभागाचे कार्यालय फक्त नावालाच असल्याचे या ठिकाणी येणाऱ्या नागरिकांनी प्रतिक्रिया देताना खंत व्यक्त केली, राजरोस पणे चालू असणाऱ्या बारामतीत तालुका व शहरात अवैध दारू अनेकांचे संसार उध्वस्त करीत असल्याने अनेक महिलांना आपले कपाळावरचे कुंकू पुसण्याची वेळ आली आहे. अधिकारी व कर्मचारी मात्र कोमात आहे की काय हे कळायला मार्ग नाही, कारण कारवाई होताना दिसत नाही.पुणे जिल्हा अधीक्षक राज्य उत्पादन शुल्क विभाग हे मात्र कोणतीच भूमिका घेताना दिसत नाही, कुठे कुठे असे धंदे चालू आहे हे सर्वज्ञात असले तरी कारवाई कधी होईल हे येणाऱ्या काळात पाहायला मिळणार आहे. लवकरच सामाजिक संघटना व राजकीय पक्ष यासाठी आवाज उठविणार असून बारामतीचे कार्यालय बंद करा करा कारण हे असून नसल्या सारखे आहे अशी प्रतिक्रिया उमटत असून आंदोलन करण्यात येणार असल्याचे कळतंय.

No comments:

Post a Comment