बारामती नगर परिषद उपनगराध्यक्षपदी श्वेता
बारामती:-नुकताच झालेल्या बारामती नगर परिषदेच्या उपनगराध्यक्षपदी नगरसेविका श्वेता योगेश नाळे यांची निवड करण्यात आली तर स्वीकृत नगरसेवक म्हणून अनुक्रमे राहुल वाघोलीकर, अमोल कावळे, गणेश जोजारे, सोमनाथ गजाकस यांची निवड करण्यात आली. ही निवड बारामती नगर परिषदेतील शरदचंद्र पवार सभागृहात पार पडलेल्या कार्यक्रमात जाहीर करण्यात आली. नगराध्यक्ष सचिन सातव तसेच बारामती नगर परिषदेचे मुख्य अधिकारी यांच्या हस्ते श्वेता नाळे यांचा पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. यावेळी नगर परिषदेमधील सर्व नवनिर्वाचित नगरसेवक उपस्थित होते. उपनगराध्यक्षपदी निवड झाल्यानंतर श्वेता नाळे यांनी शहराच्या सर्वांगीण विकासासाठी,नागरिकांच्या मूलभूत सुविधा, स्वच्छता,पाणीपुरवठा व नागरी प्रश्न सोडवण्यासाठी कटिबद्ध राहण्याचा विश्वास व्यक्त केला. तसेच नगराध्यक्ष व गटनेते व सर्व नगरसेवकांच्या सहकार्याने बारामती शहराचा विकास अधिक गतिमान करण्याचा निर्धार त्यांनी यावेळी व्यक्त केला.
No comments:
Post a Comment