पानिपत नव्हे ते तर पुण्यपत: विश्वास पाटील
वाबळे परिवाराच्या वतीने पानिपत शौर्य दिन साजरा
बारामती:(प्रतिनिधी):- पानिपतच्या लढ्यात नैसर्गिक आपत्तींनी मराठ्यांना खिंडीत गाठले. या लढ्यात मराठ्यांनी नैसर्गिक आपत्तीशी झुंज देत मोठा पराक्रम गाजवला आहे. त्यामुळे हे निव्वळ पानिपत नसून ते एक पुण्यपत आहे, असे उद्गार माजी सनदी अधिकारी, 'पानिपत' कार विश्वास पाटील यांनी काढले.
बारामती तालुक्यातील मूढाळे,कारखेल, काऱ्हाटी, देऊळगाव रसाळ येथील वाबळे कुटूंबीय व सरदार जानराव वाबळे यांच्या वंशजांनी बुधवार दि.१४ जानेवारी (मकर संक्रात ) रोजी श्रोगोंदा तालुक्यातील म्हातारपिंप्री येथे पानिपत शौर्यदिनानिमित्त अभिवादन कार्यक्रम आयोजित केला होता.
या वेळी विश्वास पाटील यांनी विचार व्यक्त केले.
या प्रसंगी सेवा निवृत्त पोलीस महासंचालक भगवंत मोरे, मधुकर झेंडे,महाराष्ट्र लोकसेवा आयोगाचे माजी अध्यक्ष किशोर निंबाळकर, कृष्णा खोरे विकास महामंडळाचे कार्यकारी संचालक हेमंत धुमाळ, कार्यकारी अभियंता प्रवीण घोरपडे,सेवानिवृत्त पोलीस अधिकारी सुनील देशमुख, किशोर जाधव, निवृत्त वन अधिकारी मोहन डेरे, रोटरी क्लब अध्यक्ष रामदास जैद व
नितीन वाबळे, बापू हिरडे ,माळेगाव साखर कारखान्याचे मा.व्हाईस चेअरमन राजेंद्र ढवाण,तानाजी देवकाते,सागर जाधव
आदी मान्यवर उपस्तीत होते.
पानिपतचा लढा हा मुस्लिमांशी नव्हता तर तो परकीय आक्रमणाशी होता. या लढ्यात मराठ्यांनी मोठा पराक्रम गाजवला आहे. पानिपत' च्या माध्यमातून मराठ्यांची
शौर्यगाथा लिहिण्याचे भाग्य मला लाभले. पानिपत म्हणजे शौर्य व देशाबद्दल अभिमान याचे प्रतीक म्हणून पुढील पिढीला कायमस्वरूपी मार्गदर्शक राहील असेही विश्वास पाटील यांनी सांगितले.
अभिनेते देवदत्त नागे म्हणाले, महाराष्ट्राचा इतिहास शुरांचा, वीरांचा आणि तितकाच स्वाभिमान जागविणारा आहे. पानिपत वीरांना अभिवादन करताना उर भरून येत आहे व हा इतिहास विसरता कामा नये.
२१ व्या शतकाकडे जाताना पुढील पीढीला बाल वयापासून पूर्वजांचा इतिहास समजावा व पूर्वजांच्या स्मृतीस विसरता कामा नये व त्यांचा इतिहास साता समुद्र पार जावा म्हणून सदर कार्यक्रम चे आयोजन दरवर्षी केले जात असल्याचे सरदार जानराव वाबळे परिवार चे संयोजक विक्रम वाबळे यांनी सांगितले.
म्हातारपिंप्री येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेला स्मार्ट पॅनल बोर्ड भेट देण्यात आला.
गड, किल्ले संवर्धन साठी कार्य करणाऱ्या संस्था चा सन्मान करण्यात आला.
सरदार जानराव वाबळे व पाणीपत,महाराष्ट्र आदी विषयावर पोवाडे सादरीकरण शाहीर राजेंद्र कांबळे व सहकाऱ्यांनी केले.
सरदार जानराव वाबळे परिवार, शिवतारा प्रतिष्ठान, शिवदुर्ग ट्रेकर्स यांनी उपस्तितांचे स्वागत केले सूत्रसंचालन सावळेपाटील व आभार
स्मितल वाबळे यांनी मानले.
No comments:
Post a Comment