बारामती शहरातील सराफ होंडा शोरुम शेजारील रोड वर टू व्हीलर मोटरसायकल पार्किंग केल्याने कारवाई.. - vadgrasta

Breaking

Post Top Ad

Friday, January 16, 2026

बारामती शहरातील सराफ होंडा शोरुम शेजारील रोड वर टू व्हीलर मोटरसायकल पार्किंग केल्याने कारवाई..

बारामती शहरातील सराफ होंडा शोरुम शेजारील रोड वर टू व्हीलर मोटरसायकल पार्किंग केल्याने कारवाई..       बारामती:- बारामती शहरातील सराफ होंडा शोरुम शेजारील रोड वर टू व्हीलर मोटरसायकल पार्किंग केल्यामुळे वाहतुकीस एका बाजूने पूर्ण अडथळा होत असल्याच्या अशा मोटर सायकल वर कारवाई करण्याबाबत बारामती वाहतूक शाखेकडे नागरिकांकडून तक्रारी प्राप्त होत होत्या. सदर तक्रारींचे गांभीर्य लक्षात घेऊन बारामती वाहतूक शाखेकडून आज दिनांक 16/01/2026 रोजी सदर मोटर सायकलवर नो पार्किंगच्या केसेस करण्यात आलेल्या असून सदर रोडवरील अतिक्रमण करून लावण्यात आलेले लोखंडी बॅरिगेट काढून सदरचा संपूर्ण रस्ता वाहतुकीस मोकळा करण्यात आलेला आहे.सदरच्या कामगिरीमुळे तेथील ये जा करणाऱ्या नागरिकांनी समाधान व्यक्त केले आहे.सदरची कारवाई पोलीस अधीक्षक संदीप गिल पुणे ग्रामीण. अपर पोलीस अधीक्षक गणेश बिरादार , बारामती उपविभागीय पोलीस अधिकारी सुदर्शन राठोड बारामती यांच्या मार्गदर्शनाखाली बारामती वाहतूक शाखेचे पोलीस निरीक्षक श्री निलेश माने पोलिस हवालदार प्रदीप काळे,पोलिस अंमलदार अजिंक्य कदम, आकाश कांबळे, महिला अंमलदार सुनीता ढेंबरे,  माया निगडे, स्वाती काजळे यांनी केली आहे.अशीच कारवाई अनेक ठिकाणी करण्याची मागणी नागरिक करीत आहे, भिगवण रोड सर्व्हिस रोड वर,कसबा, मेन रोड असं बरेच ठिकाणी विनाकारण पार्किंग केलेली असते.पेठेत स्वतःची पार्किंग नसल्याने दुकानाबाहेर अश्या गाड्या पार्किंग केल्या जातात यावर कारवाई होईल का?अशी शंका व्यक्त करण्यात आली आहे.

No comments:

Post a Comment