अश्लील व्हिडिओ दाखवत 10 लाखाची खंडणी मागणाऱ्या बारामतीच्या बंटी बबलीला अटक... - vadgrasta

Breaking

Post Top Ad

Tuesday, February 17, 2026

अश्लील व्हिडिओ दाखवत 10 लाखाची खंडणी मागणाऱ्या बारामतीच्या बंटी बबलीला अटक...

अश्लील व्हिडिओ दाखवत 10 लाखाची खंडणी मागणाऱ्या बारामतीच्या बंटी बबलीला अटक...
पुणे: १० लाखाची मागणी करत पीडितेवर अत्याचार करून अश्लील व्हिडिओ दाखवत खंडणी मागणाऱ्या बारामतीच्या बंटी- बबलीला पुण्यातील भारती विद्यापीठ पोलिसांनी अटक केली आहे.या बंटी बबलीने पुण्यासह बारामतीतील उद्योजक,अधिकाऱ्यांना हनीट्रॅप मध्ये अडकवून त्यांच्याकडून खंडणी उकळल्याची माहिती मिळत आहे. बारामतीतील प्रताप रमेश जाधव (वय ४५), पल्लवी प्रताप जाधव
(वय २८, दोघेही सद्या रा. भिंताडेनगर,आंबेगाव, पुणे) अशी पोलिसांनी अटक केलेल्या बंटी-बबलीचे नावे आहेत.याबाबत पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की,संबंधित पीडित महिला ही पतीपासून विभक्त असून तिची आणि या बंटी-बबली यांची २०२४ मध्ये ओळख झाली होती. एकमेकांवर विश्वास बसल्यानंतर संबंधित पीडित महिला या बंटी-बबलीसोबत राहू लागली.या महिलेने ३ लाख ६० हजार रुपये त्यांना परतही केले. मात्र बंटी-बबलीकडून अतिरिक्त पैशांची मागणी केली जात होती. ऑगस्ट २०२५ मध्ये पल्लवी ही घराबाहेर गेलेली असताना प्रताप जाधव याने या महिलेवर अत्याचार केले. त्यावेळी या महिलेने पोलिसांत तक्रार करण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी या
दोघांनी तिचे अश्लील फोटो आणि व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी देत तिलाच पैशांची मागणी केली.ऑक्टोबर २०२५ मध्ये या जोडीने या महिलेला बारामतीतील एका उद्योजकावर खोटा गुन्हा दाखल करण्यास सांगितलं. त्यासाठी तिला बारामतीत सदनिका आणि २० ते २५ लाख रुपये देण्याचं आमिष दाखवलं. मात्र त्यास या पीडित महिलेने नकार दिला. त्यामुळं बंटी-बबलीनं तिला पुन्हा त्रास द्यायला सुरुवात केली. या सर्व प्रकाराला कंटाळून या महिलेनं भारती विद्यापीठ पोलिस ठाण्यात तक्रार दिली. त्यानुसार या बंटी-बबली आणि एका वकिलासह एकूण सात जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.या प्रकरणी भारती विद्यापीठ पोलिसांनी तपास करत प्रताप जाधव आणि पल्लवी जाधव या दोघांना अटक केली आहे. या दोघांनी अनेकांना हनीट्रॅपमध्ये अडकवत मोठ्या प्रमाणात खंडणी उकळल्याचेही संबंधित पीडितेने पोलिस तक्रारीत म्हटले आहे.त्यानुसार पोलिसांनी तपास सुरू केला आहे. पोलीस उपायुक्त मिलिंद मोहिते यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक राहुलकुमार खिलारे, सहायक निरीक्षक स्नेहल थोरात, उपनिरीक्षक निलेश मोकाशी यांनी ही कारवाई केली आहे.घटस्फोटानंतरही बंटी-बबली एकत्र या प्रकरणातील आरोपी प्रताप जाधव आणि पल्लवी जाधव या दोघांनी घटस्फोट घेतला होता. मात्र तरीही ते एकत्रच राहत होते. बडे उद्योजक आणि अधिकारी हेरून त्यांना मायाजाळात अडकवून त्यांच्याकडून पैसे
उकळण्याचा या दोघांचा धंदा होता. त्यांनी
अनेकांकडून खंडणी उकळल्याची माहिती पुढे येत असून या दोघांकडून कुणाची फसवणूक केली असेल किंवा पैसे उकळले असतील तर भारती विद्यापीठ पोलिस ठाण्यात तक्रार द्यावी असं आवाहन पोलिस उपायुक्त मिलिंद मोहिते यांनी केलं आहे.

No comments:

Post a Comment