खळबळजनक..दूध आहे की विष ? हजारो लिटर घातक लिक्विड अन् पावडर जप्त.. बारामतीतील दूध भेसळ येईल का उघडकीस? - vadgrasta

Breaking

Post Top Ad

Tuesday, February 17, 2026

खळबळजनक..दूध आहे की विष ? हजारो लिटर घातक लिक्विड अन् पावडर जप्त.. बारामतीतील दूध भेसळ येईल का उघडकीस?

खळबळजनक..दूध आहे की विष ? हजारो लिटर घातक लिक्विड अन् पावडर जप्त.. बारामतीतील दूध भेसळ येईल का उघडकीस?
जामखेड:- महाराष्ट्रात दूध भेसळ प्रमाण वाढत असून अनेक राजकीय मंडळींनी आपली स्वतःची दूध संस्था स्थापन करून चालवित आहे, अश्यातच काही संस्था मध्ये दूध भेसळ चालू असून त्याची प्रामाणिक तपासणी केल्यास सत्य बाहेर येईल, नुकताच जामखेड तालुक्यातील फक्राबाद येथे सुरू असलेल्या दूध भेसळीच्या जीवघेण्या उद्योगावर अन्न व औषध प्रशासन व स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने संयुक्तरित्या धाड टाकत भेसळीचा भांडाफोड केला आहे.सर्वसामान्य नागरिकांच्या आरोग्याशी निर्दयपणे खेळणाऱ्या या टोळीचा काळाकुट्ट कारभार उघडकीस आला आहे. या कारवाईत तब्बल 200 लिटर क्षमतेचे 6 ड्रम असा एकूण 1200 लिटर फॅट वाढविणारे घातक लिक्विड आणि रासायनिक पावडर जप्त करण्यात आली. विशेष म्हणजे,अवघ्या 200 लिटरच्या लिक्विडच्या एका ड्रममधून तब्बल 2 ते अडीच हजार लिटर भेसळयुक्त दूध तयार केले जाऊ शकते, अशी प्राथमिक माहिती समोर आली असून जप्त मुद्देमालाची एकूण किंमत सुमारे 2 लाख 80 हजार रुपये इतकी असल्याचे सांगण्यात आले.दुधातील फॅट कृत्रिमरीत्या फुगवण्यासाठी पैराफिन ऑइल आणि कृत्रिम फ्लेवरयुक्त द्रव तसेच विशिष्ट रासायनिक पावडरचा वापर केला जात होता. घटनास्थळीच अधिकाऱ्यांनी डेमो सादर करून या भेसळीची पद्धत उघडकीस आणली. या रसायनांचा मानवी शरीरावर गंभीर व दूरगामी दुष्परिणाम होऊ शकतो, असा इशाराही अधिकाऱ्यांनी दिला आहे.
या भेसळ प्रकरणात दूध व्यवसायिक रामदास उबाळे याच्यासह समीर शेख आणि आफताब शेख यांना पोलिसांनी जेरबंद केले आहे. तिघांविरुद्ध जामखेड पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला आहे. जामखेडमध्ये
उघडकीस आलेल्या या प्रकरणामुळे दूध व्यवसायातील भेसळीचे भीषण वास्तव पुन्हा एकदा अधोरेखित झाले असून, या काळ्या साम्राज्याची मुळे किती खोलवर रुजली
आहेत, याचा सखोल तपास आता सुरू झाला असून अधिक तपास केल्यास असे गोरख धंदे बाहेर येतील फक्त जामखेड पुरती कारवाई न होता पुणे जिल्ह्यातील अनेक दुध संस्था अश्या आहेत की त्यावर कारवाई होत नाही की त्याची तपासणी केली जात नाही ती करावी यासाठी पुणे जिल्हाला सक्षम अधिकारी मिळावा यासाठी मुख्यमंत्री यांच्याकडे निवेदन देणार असल्याचे सांगण्यात आले.

No comments:

Post a Comment