तांदूळवाडी रस्त्यापासून चिंचकर इस्टेटपर्यंत रस्त्याची 'दैना'; नागरिक खड्ड्यांच्या विळख्यात!
बारामती प्रतिनिधी(रामायण धर्माधिकारी):- शहरातील तांदूळवाडी रस्त्यापासून चिंचकर इस्टेट, प्रगती नगर, देवतानगर, मोरयानगर आणि माऊली नगर या भागांना जोडणाऱ्या मुख्य 12 meter रस्त्याची दुरवस्था झाली असून नागरिकांना नरकयातना सहन कराव्या लागत आहेत. या महत्त्वाच्या रहिवासी भागांना जोडणारा हा रस्ता पूर्णपणे उखडला असून जागोजागी खड्ड्यांचे साम्राज्य पसरले आहे.
परिसरात सध्या असलेल्या रस्त्यावर खासगी कंपाऊंडचे अतिक्रमण झाले आहे. यामुळे नियोजित १२ मीटर रुंदीचा रस्ता अरुंद झाला असून, वाहतुकीसाठी मोठी अडचण निर्माण होत आहे. रस्त्याची दुरवस्था झाली असून पावसाळ्यात येथे चिखल आणि पाण्याचे साचणे यांसारख्या समस्यांना नागरिकांना सामोरे जावे लागत आहे.गेल्या अनेक दिवसांपासून या रस्त्यावर मोठमोठे खड्डे पडले असून धुळीचे लोट हवेत उडत आहेत. यामुळे दुचाकीस्वार घसरून पडण्याच्या घटना रोजच्याच झाल्या आहेत. विशेषतः शालेय विद्यार्थी, महिला आणि ज्येष्ठ नागरिकांना या रस्त्यावरून चालणेही कठीण झाले आहे. परिसरात कचऱ्याचे ढीग साचले असून रस्त्यावरील काही दिवे बंद असल्याने रात्रीच्या वेळी हा रस्ता मृत्यूचा सापळा बनत आहे.
तसेच, येथील अरुंद आणि निर्जन रस्ता अन् झाडीझुडपांचा फायदा घेऊन या ठिकाणी लुटमारीच्या घटना घडल्या आहेत.
स्थानिक रहिवाशांनी "प्रशासनाला आमचे प्रश्न दिसत नाहीत का?" असा संतप्त सवाल केला आहे.परिसरातील पाचही नगरांमधील नागरिकांनी याप्रश्नी तातडीने डांबरीकरण करण्याची मागणी केली आहे.
No comments:
Post a Comment