धक्कादायक डॉक्टर दाम्पत्याच्या खात्यातून ऑनलाईन ९२ लाख ५० हजारांचा अपहार.. - vadgrasta

Breaking

Post Top Ad

Friday, April 10, 2026

धक्कादायक डॉक्टर दाम्पत्याच्या खात्यातून ऑनलाईन ९२ लाख ५० हजारांचा अपहार..

धक्कादायक डॉक्टर दाम्पत्याच्या खात्यातून ऑनलाईन ९२ लाख ५० हजारांचा अपहार..
बारामती :-काही दिवसापूर्वी बारामतीत कोट्यावधी रुपयाची सायबर आर्थिक फसवणूक प्रकरण उघडकीस आले असताना आत्ता पुन्हा बारामती शहरात ऑनलाईन फसवणुकीचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे,
बारामती शहरातील इंदापूर रोडवरील एका नामांकित डॉक्टर व त्यांच्या पत्नीच्या बँक खात्यातून तब्बल ९२ लाख ५० हजार रुपयांचा अपहार झाल्याची घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी बारामती पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.कायदेशीर मिळालेल्या माहितीनुसार, संबंधित डॉक्टर आणि त्यांच्या पत्नीचे खाते फेडरल बँकेच्या बारामती शाखेत आहे. अज्ञात सायबर गुन्हेगाराने ऑनलाईन पद्धतीने त्यांच्या खात्यातून रक्कम ट्रान्सफर करत रांचीसह उत्तर भारतातील विविध बँक खात्यांमध्ये पैसे वळवले. या व्यवहारांबाबत संशय आल्यानंतर दाम्पत्याने तात्काळ बँक व पोलिसांकडे धाव घेतली.फिर्यादीत नमूद केल्याप्रमाणे, संबंधित इसमाने अत्यंत चलाखीने ऑनलाईन व्यवहार करत टप्प्याटप्प्याने ही रक्कम हस्तांतरित केली. या प्रकरणामुळे शहरात खळबळ उडाली आहे.दरम्यान, बारामती शहर पोलिसांनी गुन्हा नोंद करून सायबर तज्ज्ञांच्या मदतीने तपास चालू असून याबाबत लवकरच माहिती पुढे येईल .

No comments:

Post a Comment