महात्मा ज्योतीबा फुले विश्वरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या संयुक्त जयंती निमित्त दौंड येथे रक्तदान शिबिराचे आयोजन..
दौंड:- राष्ट्रपिता महात्मा ज्योतिबा फुले व विश्वरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या संयुक्त जयंती निमित्त रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया ए राष्ट्रीय अध्यक्ष दिपकभाऊ निकाळजे व सम्यक तथागत सोशल अँड कल्चरल फाउंडेशनच्या विद्यमाने 10 एप्रिल 2026 रोजी भव्य रक्तदान शिबिर पार पडले. रक्तदान शिबिराचे उद्घाटन अस्थिरोग तज्ञ डॉक्टर रोहन खवटे यांच्या हस्ते करण्यात आला, त्या समयी आमचे मार्गदर्शक विकास बाबा कदम यांच्या हस्ते महापुरुषांना पुष्पहार अर्पण करण्यात आला त्यावेळी सर्व विविध मित्रपरिवार व भीमसैनिकांनी 42 रक्त पिशवी संकलित करून डॉ बाबासाहेब आंबेडकर व महात्मा ज्योतिबा फुले यांना अभिवादन करण्यात आले त्यावेळी पक्षाचे जिल्हाध्यक्ष तथा संस्थेचे संस्थापक अध्यक्ष सचिन भाऊ खरात यांच्या नेतृत्वात व शशांक गायकवाड यांच्या अध्यक्षतेखाली व दिगंबर रिकीबे यांच्या उपाध्यक्षतेखाली कार्यक्रम पार पडला.
No comments:
Post a Comment