बारामतीत गायीला राष्ट्रीय पशु घोषित करण्याच्या मागणीचे मुस्लिम बांधवानी दिले निवेदन.. - vadgrasta

Breaking

Post Top Ad

Monday, May 25, 2026

बारामतीत गायीला राष्ट्रीय पशु घोषित करण्याच्या मागणीचे मुस्लिम बांधवानी दिले निवेदन..

बारामतीत गायीला राष्ट्रीय पशु घोषित करण्याच्या मागणीचे मुस्लिम बांधवानी दिले निवेदन..         बारामती:- बारामतीत मुस्लिम बांधवाचे मा. प्रांताधिकारी,बारामती उपविभाग, बारामती.मा. तहसीलदार,बारामती.मा. उपविभागीय पोलीस अधिकारी (DYSP),बारामती,मा. पोलीस निरीक्षक - बारामती शहर पोलीस स्टेशन,बारामती.यांना गायीला राष्ट्रीय पशु घोषित करणे, गोसंवर्धन, गोतस्करी प्रतिबंध, शेतकरी हित संरक्षण व कायदा सुव्यवस्था राखण्याबाबत
निवेदन नुकताच बारामती मुस्लिम समाज,बारामती यांच्या वतीने निवेदन देण्यात आले,यामध्ये महाराष्ट्र शासनाने लागू केलेले गोहत्या बंदी, गोतस्करी प्रतिबंध व गोसंरक्षण संदर्भातील कायद्यांना बारामतीतील मुस्लिम समाज बांधवांचा संपूर्ण पाठिंबा आहे. तसेच
आमच्या बहुसंख्य हिंदू बांधवांच्या आस्थेचा श्रद्धेचा विषय असलेल्या गोमातेला “राष्ट्रीय पशु” घोषित करण्यात यावे, अशी आमची शासनाकडे नम्र मागणी आहे.महाराष्ट्र प्राणी संरक्षण अधिनियम, १९७६ तसेच भारतीय न्याय
संहिता (BNS) आणि इतर लागू कायद्यांनुसार गोवंश संरक्षणाची अंमलबजावणी होत असताना शेतकरी, पशुपालक व सर्वसामान्य नागरिक यांच्यासमोरील आर्थिक, सामाजिक व व्यवस्थापनाशी संबंधित अडचणी विचारात घेणे आवश्यक आहे.त्यामुळे आपल्या मार्फत शासनाकडे पुढील मागण्या करण्यात
याव्यात, ही नम्र विनंती करून खालील 
1. गायीला "राष्ट्रीय पशु" घोषित करण्यात यावे
2. निरुपयोगी, आजारी अथवा पालन करणे अशक्य झालेल्या गायींसाठी शेतकऱ्यांना योग्य आर्थिक मोबदला व अनुदान देण्यात यावे.
3. गोपालन, गाईंचे संगोपन व संवर्धन करण्यासाठी शेतकऱ्यांना व गोशाळांना प्रतिदिन रुपये ५०० प्रमाणे अनुदान देण्यात यावे.
4. गोशाळा व्यवस्थापन, गोवंश पालनपोषण, वैद्यकीय सेवा, मृत
जनावरांची विल्हेवाट व संबंधित सर्व खर्चाची संपूर्ण जबाबदारी
शासनाने स्वीकारावी.
5. गोवंश विक्री, खरेदी, वाहतूक किंवा कत्तल संदर्भात बेकायदेशीर
कृत्य करणाऱ्या व्यक्तींवर मोक्कांतर्गत कायद्यानुसार कठोर कारवाई
करण्यात यावी.
6. कोणत्याही व्यक्ती अथवा संघटनांनी कायदा हातात घेणे,
सामाजिक तेढ निर्माण करणे किंवा विशिष्ट समाजाला लक्ष्य करणे
यास प्रतिबंध करण्यात यावा व कायद्याची अंमलबजावणी केवळ
शासन व पोलीस प्रशासनामार्फतच करण्यात यावी.
7. गोसंरक्षणाच्या नावाखाली मॉब लिंचिंग, धमकी, मारहाण,
जबरदस्ती अथवा कायदा हातात घेऊन गुन्हेगारी करणाऱ्या
प्रवृत्तीच्या व्यक्तींवर पोलीस प्रशासनामार्फत तात्काळ व कठोर
कायदेशीर कारवाई करण्यात यावी.
भारतीय संविधानातील कलम १४, १९, २१ तसेच राज्याच्या
मार्गदर्शक तत्त्वांतील कलम ४८ अन्वये नागरिकांचे मूलभूत हक्क,
कायद्यापुढील समानता, जीवन व स्वातंत्र्याचा अधिकार तसेच
पशुसंवर्धन यांचा समतोल राखून शासनाने सर्वसमावेशक धोरण
राबवावे, ही विनंती.
सदर निवेदनाची दखल घेऊन योग्य ती कार्यवाही करण्यात यावी,असे पत्र बारामती मुस्लिम समाज बांधव,बारामती यांनी दिले.

No comments:

Post a Comment