भारत मुक्ती मोर्चाच्या राज्य कार्यकारणी सदस्यपदी ॲड.सुशिल अहिवळे - vadgrasta

Breaking

Post Top Ad

Monday, May 25, 2026

भारत मुक्ती मोर्चाच्या राज्य कार्यकारणी सदस्यपदी ॲड.सुशिल अहिवळे

भारत मुक्ती मोर्चाच्या राज्य कार्यकारणी सदस्यपदी ॲड.सुशिल अहिवळे 

बारामती:- भारत मुक्ती मोर्चा या राष्ट्रव्यापी संघटनेच्या महाराष्ट्र राज्य कार्यकारणी सदस्यपदी बारामती येथील ॲड.सुशिल भारत अहिवळे यांची निवड करण्यात आली आहे.बामसेफ,भारत मुक्ती मोर्चाचे राष्ट्रीय अध्यक्ष वामन मेश्राम यांच्या आदेशानुसार प्रदेशाध्यक्ष सचिन बनसोडे यांनी हि निवड केली आहे.

भारत मुक्ती मोर्चा हि देशातील बहुजनांची सर्वात मोठी सामाजिक संघटना असून आगामी काळात या संघटनेच्या माध्यमातून शिव-फुले-शाहू-आंबेडकरांची आणि बहुजन महापुरुषांची समतेची विचारधारा अधिक बळकट करण्यासाठी प्रयत्न करणार असून सोबतच भारत मुक्ती मोर्चा सातत्याने ज्या विषयांवर आवाज उठवत आली आहे.असे ओबीसींची जातीनिहाय जनगणना करण्याचा मुद्दा आणि ईव्हीएम विरोधातील आंदोलन यांसारखे अन्य ज्वलंत मुद्दे लोकांपर्यंत घेऊन जाऊन हि जनआंदोलने अधिक तीव्र करणार असल्याचे या निवडीनंतर ॲड.अहिवळे यांनी सांगितले.दरम्यान याआधी ॲड.अहिवळे यांनी भारत मुक्ती मोर्चाच्या  पुणे जिल्हा उपाध्यक्ष आणि कार्याध्यक्ष पदी देखील काम केले आहे.

No comments:

Post a Comment