जनगणनेचे काम करताना हार्ट अटॅकने शिक्षकाचा मृत्यू.. - vadgrasta

Breaking

Post Top Ad

Monday, May 25, 2026

जनगणनेचे काम करताना हार्ट अटॅकने शिक्षकाचा मृत्यू..

जनगणनेचे काम करताना हार्ट अटॅकने शिक्षकाचा मृत्यू..
सांगोला:-ऐन उन्हाच्या वातावरणात सांगोल्यातील गावडे वस्ती परिसरातील घटना घडली सांगोल्यात विद्यामंदिर प्रशालेत सहशिक्षक होते
• जनगणना प्रगणक म्हणून होते नियुक्तीवर
जनगणनेचे राष्ट्रीय कर्तव्य बजावत असताना सांगोल्यातील राजाराम दामोदर ढोले (वय ४९) या शिक्षकाचा हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने मृत्यू झाला.सांगोल्यातील विद्यामंदिर प्रशालेत ते सहशिक्षक म्हणून कार्यरत होते. राजाराम ढोले यांची जनगणना प्रगणक म्हणून नियुक्ती करण्यात आली होती.ढोले हे सोमवारी सकाळी ९.४५ वाजण्याच्या सुमारास सांगोला शहरालगतच्या गावडे वस्ती परिसरात
जनगणनेअंतर्गत माहिती संकलनाचे काम करत होते.त्याचवेळी त्यांना अचानक अस्वस्थ वाटू लागले. काही क्षणांतच त्यांना हृदयविकाराचा तीव्र झटका आला.यामुळे जनगणना करणारे चिंता व्यक्त करीत आहे, जनगणना करीत असताना भयाण उन्हाचा त्रास सहन करावा लागत असल्याचे बोलताना दिसत आहे.

No comments:

Post a Comment