विरगळ: लाकडाच्या ढिगाऱ्यापलीकडे असलेला आपल्या गावाचा इतिहास..! - vadgrasta

Breaking

Post Top Ad

Sunday, May 24, 2026

विरगळ: लाकडाच्या ढिगाऱ्यापलीकडे असलेला आपल्या गावाचा इतिहास..!

विरगळ: लाकडाच्या ढिगाऱ्यापलीकडे असलेला आपल्या गावाचा इतिहास..!
बारामती:- आज गावाचा दौरा करताना अत्यंत सुस्थितीत असलेले दोन   *'वीरगळ'*  एका लाकडाच्या ढिगाऱ्याच्या पलीकडे पाहायला मिळाले. हा ऐतिहासिक ठेवा आजवर सुरक्षित ठेवल्याबद्दल संबंधितांचे मनापासून आभार.
गाव, देव, देश, राज्य आणि धर्मासाठी प्राणांचे बलिदान देणाऱ्या वीरांच्या शौर्याची साक्ष म्हणजे हे विरगळ! पुढील पिढ्यांनी त्यांच्या त्यागाचा आदर्श घ्यावा म्हणून गावोगावी ही स्मारके उभारली गेली.
हा ठेवा सुस्थितीत असला, तरी तो लाकडाच्या ढिगाऱ्यापलीकडे नजरेआड राहण्यापेक्षा त्याला एका सन्मानाच्या आणि मोकळ्या जागी आणणे गरजेचे आहे. ज्यांनी हे आजवर टिकवून ठेवले, त्यांनीच आता पुढाकार घेऊन या वीरगळांना अधिक चांगल्या व मानाच्या ठिकाणी स्थापित करावे, जेणेकरून संपूर्ण गावाला त्यांचा अभिमान वाटेल.
चला, आपण सगळे मिळून आपल्या गावातील या ऐतिहासिक ठेव्याचे अधिक सन्मानाने जतन करूया!

*भीमथडी इतिहास संशोधन संस्था बारामती*
*संपर्क:*
विनोद खटके - ९७८८५३७३२३
मनोज कुंभार - ८४८२८४६८४९

No comments:

Post a Comment