रेकॉर्डवरील सराईत आरोपी अटक,४,२८,८३२/-रु.किंमतीचा मुद्देमाल केला हस्तगत.. - vadgrasta

Breaking

Post Top Ad

Thursday, May 21, 2026

रेकॉर्डवरील सराईत आरोपी अटक,४,२८,८३२/-रु.किंमतीचा मुद्देमाल केला हस्तगत..

रेकॉर्डवरील सराईत आरोपी अटक,४,२८,८३२/-रु.किंमतीचा मुद्देमाल केला हस्तगत..
पुणे :- स्थानिक गुन्हे शाखा पुणे ग्रामीणची कारवाईत रेकॉर्डवरील सराईत आरोपी अटक करून विद्युत रोहीत्र (ट्रान्सफॉर्मर) चोरीचे ५, घरफोडीचे ३, चोरीचे ६ असे एकुण १४ गुन्हे उघडकीस आणून २७२ किलो ग्रॅम वजनाच्या तांब्याच्या तारांसह सोने-चांदीचे दागिने असा एकूण रू. ४,२८,८३२/- किंमतीचा मुद्देमाल केला हस्तगत करण्यात आला, पुणे ग्रामीण जिल्हयात विद्युत रोहीत्र (ट्रान्सफॉर्मर) चोरीचे प्रमाण वाढले होते. विद्युत रोहीत्र चोरी गेल्याने परीसरातील
शेतकऱ्यांच्या पिकांचे नुकसान होत असे, तसेच परीसरात अंधार राहत असल्याने इतर चोरीच्या शक्यता वाढत होत्या त्यामुळे
नागरीकांकडून नाराजी व्यक्त केली जात होती.
विद्युत रोहीत्र हे दुर्गम भागात असल्याने चोरी झालेनंतर प्रत्यक्षदर्शी साक्षीदार, सीसीटीव्ही याद्वारे तपास होणे अडचणीचे होते.
मा. पोलीस अधीक्षक साो. पुणे ग्रामीण यांनी स्था. गु.शा.चे पथकाची बैठक घेवून सन २०२६ मधील दाखल गुन्हयांचा आढावा घेवून गुन्हे
उघडकीस आणण्याकरीता मागदर्शन करून सुचना केल्या. त्या अनुषंगाने तपास पथकांनी तपास सुरू केला. तपास पथकाकडून गुन्हे
घडलेली ठिकाणे, गुन्हयांची वेळ, गुन्हयांची कार्यपद्धती याचा आढावा घेण्यात आला.
तपास पथकाने गुन्हयांची घटनास्थळे पडताळून घटनास्थळा कडे येणारे जाणारे रोडवरील सीसीटीव्ही फुटेज तपासणेत आले.
स्थानिक गुन्हे शाखेची तपास पथकांनी रेकॉर्डवरील गुन्हेगार तपासून त्यांच्या सध्याच्या हालचालींवर लक्ष केंद्रीत करून तपास चालू केला.
सदरचे गुन्हे हे रेकॉर्डवरील आरोपीने केले असल्याचे गोपनीय बातमीदाराकडून माहिती मिळाली. आरोपी नसुरुद्दीन हिरामण भोसले
रा. कोऱ्हाळे ता. बारामती जि पुणे याने विद्युत रोहीत्र चोरीचे व इतर मालमत्ता चोरीचे गुन्हे केले असल्याची माहिती मिळाल्याने आरोपी
आरोपी नामे १) नसरुद्दीन हिरामण भोसले वय २४ वर्षे रा. को-हाळे ता. बारामती जि पुणे यास दि. ११/०५/२०२६ रोजी को-हाळे
परिसरातून ताब्यात घेवून त्याचेकडे कडे चौकशी केली असता, त्याने इतर एका साथीदारासह पुणे जिल्हयातील विविध ठिकाणी विद्युत
रोहीत्र (ट्रान्सफॉर्मर) चोरीचे, तसेच घरफोडी व चोरीचे गुन्हे केल्याचे सांगितले. तपासा दरम्यान २७२ किलो ग्रॅम वजनाच्या तांब्याच्या
तारांसह दीड तोळे वजनाचे सोन्याचे दागिने, १०० ग्रॅम चांदी असे एकूण रू. ४,२८,८३२/- रू. कि. चा मुद्देमाल हस्तगत करणेत
आलेला आहे. चौकशीमध्ये त्यांचेकडून खालील १४ गुन्हे उघडकीस आलेले आहेत.
उघडकीस आलेले गुन्हे
अ.क्र. 
ताब्यात घेण्यात आलेल्या आरोपीवर पुणे ग्रामीण जिल्हयात यापुर्वी विद्युत रोहीत्र चोरीचे, घरफोडी चोरीचे गुन्हे दाखल आहेत.
सदरची कामगिरी मा. पोलीस अधीक्षक श्री. संदीप सिंह गिल्ल साो. पुणे ग्रामीण, मा. अपर पोलीस अधीक्षक श्री. गणेश बिरादार,
बारामती विभाग, मा. उपविभागीय पोलीस अधिकारी श्री. सुदर्शन राठोड, बारामती उपविभाग, यांचे मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे
पोलीस निरीक्षक प्रमोद क्षीरसागर, बारामती तालुका पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव स्था.गु.शा. चे सपोनि कुलदीप
संकपाळ, पोलीस, श्रेणी पोसई बाळासाहेब कारंडे स्था. गु. शाखेचे अंमलदार, असिफ शेख, अजय घुले, अभिजीत एकशिंगे, स्वप्नील
अहिवळे, निलेश शिंदे, राजु मोमीण, अतुल डेरे बारामती तालुका पोलीस स्टेशनचे अंमलदार सागर देशमाने, शोभा देवकाते यांनी केली
असून आरोपी सध्या पोलीस कस्टडी रिमांड मध्ये असून पुढील तपास बारामती तालुका पोलीस स्टेशन करत आहेत.

No comments:

Post a Comment