महिलांच्या असहाय्यतेच्या फायदा घेत चालू होता देहविक्री व्यवसाय,पोलीस व दहशतवाद विरोधी शाखेची संयुक्त कारवाई.. - vadgrasta

Breaking

Post Top Ad

Wednesday, June 3, 2026

महिलांच्या असहाय्यतेच्या फायदा घेत चालू होता देहविक्री व्यवसाय,पोलीस व दहशतवाद विरोधी शाखेची संयुक्त कारवाई..

महिलांच्या असहाय्यतेच्या फायदा घेत चालू होता देहविक्री व्यवसाय,पोलीस व दहशतवाद विरोधी शाखेची संयुक्त कारवाई..
रांजणगाव :-दि.02/06/2026 रोजी दुपारी 4.00 वा. चे सुमारास कारेगावाचे हद्दीतील नगर पुणे हायवे रोडलगतच्या "जयश्री फर्निचरच्या" बाजुला असलेल्या लॉजिंगमध्ये रांजणगाव MIDC पोलीस स्टेशन व दहशतवादी विरोधी
शाखा यांनी संयुक्त छापा कारवाई केली आहे. सदरची कारवाई हि मा.भुषण माने पोलीस उपअधिक्षक, पोलीस मुख्यालय, पुणे ग्रा. यांना मिळालेल्या गोपनिय माहितीच्या आधारे करण्यात आलेली असुन त्यांचे नेतृत्वामध्ये
रांजणगाव MIDC पोलीस स्टेशन व दहशतवाद विरोधी शाखा-पुणे ग्रा. यांचे पथकाने संयुक्तपणे केली आहे.सदर छापा कारवाईमध्ये आरोपी नामे 1) लुतफ्फर मुज्जमलहक शेख वय 45 वर्षे, मुळ रा.नालीताजल, ता.बाजीतपुर, थाना धनियाखाली, जि. हुगली, पश्चिम बंगाल, सध्या रा. कारेगाव, ता. शिरूर, जि. पुणे
(2) बबलु साहु सध्या रा. कारेगाव, ता. शिरुर, जि. पुणे मुळ रा. उडीसा यांचेविरुध्द स्त्रीया व मुली अनैतिक व्यापार प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदर आरोपी हे महिलांच्या असहाय्यतेच्या फायदा घेवुन त्यांना लैंगीक हेतु करीता अवैधरित्या संगणमताने देहविक्री करीत असताना मिळून आले आहेत.ताब्यात घेण्यात आलेला आरोपी लुतफ्फर शेख याला गुन्हयाचे कामी अटक करण्यात आलेली असुन आरोपी बबलु साहु हा फरार असुन त्याचेविरुध्द यापुर्वी देखील अशा प्रकारे वेश्याव्यवसाय चालविले प्रकरणी रांजणगाव
पोलीसांनी गुन्हा दाखल केलेला आहे.
सदर छापा कारवाईमध्ये एकुण सात महिलांची पोलीसांनी सुटका केली असुन सुटका केलेल्या
महिलांपैकी तीन महिला या बांग्लादेशी असल्याचे निष्पन्न झाले आहे. सदर पिडीत महिलांना महिला सुधारगृह,मुंढवा, पुणे येथे सुरक्षेच्या दृष्टीने ठेवण्यात आलेले आहे. सदर पिडीत बांग्लादेशी महिलांना कायदेशीर प्रक्रिया पुर्ण झाल्यावर परत बांग्लादेशामध्ये पाठविण्याची (डिपोर्ट) कारवाई सुरु करण्यात आलेली आहे.सदरची कारवाई हि मा. संदीप गिल्ल सो. पोलीस अधिक्षक सो. पुणे ग्रा, श्री. प्रशांत ढोले सो उपविभागीय पो.अधिकारी शिरुर विभाग यांचे मार्गदर्शना खाली श्री. भुषण माने, पोलीस उपअधिक्षक, पोलीस मुख्यालय, पुणे ग्रा. यांचे नेतृत्वामध्ये रांजणगाव MIDC पोलीस स्टेशनचे श्री. अविनाश थोरात, पोलीस उपनिरीक्षक, पो. हवा. संतोष औटी, पो. हवा. विलास आंबेकर, ब्रम्हा पोवार, विजय सरजिने, संदिप जगदाळे,
पो. कॉ. संतोष साळुंखे, अमोल रासकर, किशोर शिवणकर, योगेश गुंड, म.पो. हवा. विद्या बनकर,म.पो.काँ. मोहीनी पाटील, म.पो.काँ. शुभांगी लबडे, सोनाली जगताप तसेच दहशतवाद विरोधी शाखेचे पोलीस अंमलदार सहा. फौज. महेश गायकवाड, सहा. फौज. विशाल गव्हाणे, पो.काँ. ओंकार शिंदे, पो.काँ. मोसीन शेख, पो.हवा. गणेश चंदनशिव यांचे दोन वेगवेगळे पथके तयार करुन करण्यात आलेली आहे. सदर गुन्हयांचा पुढील तपास श्री. महादेव वाघमोडे पोलीस निरीक्षक यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक श्री. अविनाश थोरात, रांजणगाव
MIDC पो.स्टे. हे करीत आहेत.

No comments:

Post a Comment