बारामती सत्र न्यायालयात गंभीर गुन्ह्यातील दोन आरोपींची निर्दोष मुक्तता.. - vadgrasta

Breaking

Post Top Ad

Wednesday, June 3, 2026

बारामती सत्र न्यायालयात गंभीर गुन्ह्यातील दोन आरोपींची निर्दोष मुक्तता..

बारामती सत्र न्यायालयात गंभीर गुन्ह्यातील दोन आरोपींची निर्दोष मुक्तता..
बारामती, दि. ३ जून २०२६ : बारामती येथील अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायालयाने दिनांक २ जून २०२६ रोजी एका गंभीर स्वरूपाच्या फौजदारी प्रकरणात दोन्ही आरोपींना पुराव्याअभावी निर्दोष मुक्त केले आहे. न्यायालयाने दिलेल्या निकालानुसार अभियोजन पक्ष आरोपींवरील आरोप ठोस व विश्वासार्ह पुराव्यांच्या आधारे सिद्ध करण्यात अपयशी ठरला.सदर प्रकरणात एका १९ वर्ष वय असलेल्या मुलीने तिचा नातेवाईक असलेल्या व्यक्तीविरुद्ध वारंवार लैंगिक अत्याचार (बलात्कार), मारहाण, धमकी देणे तसेच इन्स्टाग्रामवर अश्लील छायाचित्रे प्रसारित केल्याचे आरोप केले होते. तसेच दुसऱ्या आरोपीवर फोनद्वारे शिवीगाळ व धमकी दिल्याचा आरोप करण्यात आला होता. याप्रकरणी २०१९ मध्ये आरोपीं विरोधात भारतीय दंड संहिता कलम ३७६(२) (एन), ३५४सी, ५०६, ३२३ व ५०६,३४ अन्वये बारामती तालुका पोलिस स्टेशन मध्ये गुन्हा दाखल करण्यात आलेला होता.
आरोपींना दोषी ठरविण्यासाठी आवश्यक असा कोणताही विश्वासार्ह व ठोस पुरावा अभिलेखावर उपलब्ध झाला नाही, त्यामुळे बलात्कार, विनयभंग, धमकी, मारहाण तसेच शिवीगाळ व धमकीसंबंधीचे व अश्लील छायाचित्रे प्रसारित केल्याचे सर्व आरोप सिद्ध झाले नसल्याचे न्यायालयाने स्पष्ट केले.त्यानुसार बारामती येथील अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायाधीश श्री.हितेंद्र वाणी यांनी दोन्ही आरोपींना सर्व आरोपांतून निर्दोष मुक्त करण्याचा आदेश दिले आहेत, या प्रकरणात आरोपींच्या वतीने ॲड.हेमचंद्र मोरे यांनी काम पाहिलेले आहे.

No comments:

Post a Comment