बारामती तालुक्यात वादळी पावसामुळे एक महिलेच्या मृत्यूसह ११ शेळ्याचा मृत्यू... - vadgrasta

Breaking

Post Top Ad

Tuesday, June 2, 2026

बारामती तालुक्यात वादळी पावसामुळे एक महिलेच्या मृत्यूसह ११ शेळ्याचा मृत्यू...

बारामती तालुक्यात वादळी पावसामुळे एक महिलेच्या मृत्यूसह ११ शेळ्याचा मृत्यू...      बारामती :- पुणे जिल्ह्यातील बारामती परिसरात मुसळधार पावसामुळे एक दुर्दैवी घटना घडली.पावसाशी संबंधित दुर्घटनेत एका महिलेचा मृत्यू झाल्याने परिसरात हळहळ व्यक्त होतआहे. या घटनेमुळे प्रशासनाने नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे.याबाबत मिळालेल्या माहितीनुसार बारामती तालुक्यातील लोणी-माळवाडी हद्दीत मंगळवारी (दि. २ जून) सायंकाळी सुमारे ४.३० वाजण्याच्या सुमारास झालेल्या वादळी पावसामुळे नैसर्गिक आपत्तीत भिंत व शेड कोसळल्याने एका महिलेचा जागीच मृत्यू झाला असून तीन जण जखमी झाले बारामती तालुक्यातील लोणी-माळवाडी हद्दीत मंगळवारी (दि.२ जून) सायंकाळी सुमारे ४.३० वाजण्याच्या सुमारास झालेल्या वादळी पावसामुळे नैसर्गिक आपत्तीत भिंत व शेड कोसळल्याने एका महिलेचा जागीच मृत्यू झाला असून तीन जण जखमी झाले आहेत. तसेच ११ बकरी, बोकड व शेळ्यांचाही मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे.मिळालेल्या माहितीनुसार,लोणी-माळवाडी परिसरात अचानक
वादळी पाऊस आणि जोरदार वाऱ्याने थैमान घातले. यावेळी बंद असलेल्या साक्षी ढाब्याजवळ आडोशाला थांबलेल्या नंदाबाई जनार्दन लडकत (वय ६५) यांच्या अंगावर भिंत व पत्र्याचे शेड कोसळल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला. या दुर्घटनेत मंदा प्रताप फरांदे, प्रल्हाद पांडुरंग लडकत व बाळासाहेब अमृता लडकत हे किरकोळ जखमी झाले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.तब्बल ११ शेळ्या व मेंढ्या दगावल्या व चार-पाच शेळ्या जखमी झाल्या आहेत अशी माहिती मिळत आहे. त्यामुळे शेतकरी व पशुपालकांचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे.
मृत्यू झालेल्या नंदा जनार्दन लडकत या माळवाडीच्या माजी सरपंच मंजुषा लडकत यांच्या सासूबाई होत्या. त्यांच्या निधनामुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.या दुर्घटनेची माहिती मिळताच लोणी भापकरचे मंडल अधिकारी संतोष नलावडे, माळवाडी-लोणीचे तलाठी विकास बारवकर,जळगावचे तलाठी संदीप भांडवलकर तसेच लोणी भापकरचे पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. सूरज सावंत यांनी घटनास्थळी धाव घेऊन प्रत्यक्ष पाहणी केली व पंचनामा केला. यावेळी पळशीचे ग्रामसेवक विठ्ठल घाडगे, तसेच माळवाडीचे काही ग्रामस्थ उपस्थित होते.घटनेची माहिती मिळताच एपीआय मनोजकुमार नवसारे यांच्या मार्गदर्शनाखाली सुपा पोलीस ठाण्याचे पोलीस हवालदार संतोष पवार, अमोल चिरमे, संतोष जावीर, सचिन दरेकर यांनी घटनास्थळी दहा मिनिटाच्या आत धाव घेत जखमींना मदत केली. पुढील तपास सुपा पोलीस करीत आहेत.

No comments:

Post a Comment