"आधुनिक होळकरशाही" पुस्तकाच्या मुखपृष्ठाचा प्रकाशन सोहळा संपन्न.. - vadgrasta

Breaking

Post Top Ad

Tuesday, June 2, 2026

"आधुनिक होळकरशाही" पुस्तकाच्या मुखपृष्ठाचा प्रकाशन सोहळा संपन्न..

"आधुनिक होळकरशाही" पुस्तकाच्या मुखपृष्ठाचा प्रकाशन सोहळा संपन्न..
बारामती : ३१ मे २०२६ या दिवशी अहिल्यादेवी होळकर यांची जयंती दिवस या दिवशी लेखक मा.श्री.नवनाथ मनोहर वळकुदे यांच्या “आधुनिक होळकरशाही" या पुस्तकाच्या मुखपृष्ठाचा प्रकाशन सोहळा अहिल्यादेवी होळकर यांच्या चौंडी या त्यांच्या जन्मगावी मोठ्या थाटात व मा. ना. श्री. एकनाथजी शिंदे सो. उपमुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य तसेच मा. ना. श्रीमती सुनेत्रावहिनी पवार उपमुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य, मा. ना. प्रा. राम शिंदे सो सभापती विधानपरिषद, महाराष्ट्र राज्य माजी ग्रामविकास मंत्री आण्णा डांगे जतचे लोकप्रिय आमदार गोपीचंद पडळकर, कृषीमंत्री दत्तात्रय (मामा) भरणे सो मा. आमदार रामहरी रूपनवर मा. खा.रामराव वडकुते, मा. आ. श्री. नारायण पाटील, आ. श्री. सचिन कांबळे, आ.
श्री. बाबासाहेब देशमुख, मा. खा. श्री. विकास महात्मे, मा. आ. श्री. पोपटराव गावडे, मा. आ. अनिल गोटे,मा. आ. श्री. प्रकाश शेंडगे, मा. आ. नानाभाऊ कोकरे, मा. आ. श्री. हरिभाऊ भदे, आ. श्री. उत्तमराव जानकर, मा. आ. अनंतकुमार पाटील, मा.आ.सुनिल कर्जतकर, मा. आ. मोनिकाताई राजळे, मा. आ.अमोल खताळ, अशा अनेक मान्यवरांच्या हस्ते पुस्तकाचे मुखपृष्ठ प्रकाशन सोहळा पार पडला.त्यावेळी राज्याचे सभापती राम शिंदे साहेब यांनी पुस्तकाला भर-भरून शुभेच्छा दिल्या. तसेच एकनाथ शिंदे साहेब यांनी देखील “आधुनिक होळकरशाही' हया विषयाशी हया ग्रंथास पुस्तकाचे लेखक श्री. नवनाथ वळकुंदे यांचे अभिनंदन केले आणि म्हणाल कि, अशा नवनवीन विषयावर
लिहिणे हे खुप महत्वाचे आहे.आधुनिक होळकरशाहीचा नविन माहिती संशोधकीय लिखाण वळकुदे करीत आहेत.तरी त्यांचे म्हणणे आहे की, मला पुस्तकाला अभिप्राय दयावा तो देखील मी हया पुसतकाला नक्कीच देणार असे ही ते म्हणाले. तसेच आधुनिक होळकरशाहीचा इतिहास हा सामाजिक क्रांतीचा खुप
मोठा एैतिहासिक टप्पा आहे आणि तो जनसामान्यांपर्यंत पोहोचला पाहिजे या पुस्तकाच्या रूपाने तो नक्कीच जनसामान्यांपर्यंत पोहोचेल असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.
आदरणीय सुनेत्रावहिनी पवार यांनी नविन विषयावरील हया पुस्तकाचे मनःपुर्वक स्वागत केले. अशा प्रकारच्या लिखाणाची गरज सध्याच्या काळात आहे असे मत त्यांनी व्यक्त केले.
तरी हजारोच्या संख्येने काल जनता चौंडी या जन्मस्थळी दाखल होती त्यांच्या उपस्थित
सर्व मान्यवरांनी “आधुनिक होळकरशाही' या पुस्तकाला भरभरून शुभेच्छा दिल्या व नविन विषयावर प्रथमचः होत असलेल्या श्री. नवनाथ मनोहर वळकुंदे याच्या लिखाणाचे स्वागत केले.

No comments:

Post a Comment