इंडियन सोसायटी ऑफ स्ट्रक्चरल इंजिनिअर्स, बारामती लोकल सेंटर ची कार्यकारिणी जाहीर - vadgrasta

Breaking

Post Top Ad

Tuesday, June 2, 2026

इंडियन सोसायटी ऑफ स्ट्रक्चरल इंजिनिअर्स, बारामती लोकल सेंटर ची कार्यकारिणी जाहीर

इंडियन सोसायटी ऑफ स्ट्रक्चरल इंजिनिअर्स,  बारामती लोकल सेंटर ची कार्यकारिणी जाहीर
बारामती:- दिनांक 30/05/2026 रोजी आयोजित करण्यात आलेल्या वार्षिक सर्वसाधारण  सभेमध्ये वार्षिक कामाचा आढावा व विविध विषयावर सकारात्मक चर्चा झाली. तसेच सन 2026- 2027 साठी सर्वानुमते कार्यकारिणी निवड करण्यात आली. अध्यक्ष इंजि. गणेश नरुटे, सचिव इंजि. मयूर ताडे,  खजिनदार इंजि. सुरज बा. कोकरे यांची निवड करण्यात आली. त्याचप्रमाणे कार्यकारिणी सदस्यपदी प्रा. डॉ. गुणवंत काटे, इंजि. विनोद करे, प्रा. नीलम बारवकर व इंजि. निलेश नाळे यांची निवड करण्यात आली. तसेच प्रमुख सल्लागार म्हणून इंजि. शामराव राऊत यांची निवड करण्यात आली.
       निवडणुक निर्णय अधिकारी म्हणून प्रा. शहाजी परकाळे यांनी काम पाहिले. मावळते अध्यक्ष इंजि. सुरज चांदगुडे यांनी सर्वांचे स्वागत केले, मावळते सचिव इंजि. विकास निर्मळ यांनी सर्वांचे आभार मानले. तसेच संस्थेचे जेष्ठ सदस्य इंजि. हर्षवर्धन शिंदे व प्रा. डॉ. श्रीकांत बोबडे यांनी नवनिर्वाचित कार्यकारिणीला शुभेच्छा दिल्या.

No comments:

Post a Comment