अधिकमासानिमित्त ग्रंथ दिंडी व धर्मसभेसाठी काशी महास्वामीजींचे बारामती नगरीत आगमन
धार्मिक व आध्यात्मिक सोहळा सोमवार दिनांक ८ जून रोजी संपन्न होणार आहे.
बारामती(रामायण धर्माधिकारी):-
ज्येष्ठ अधिक मासानिमित्त प. पू. काशी ज्ञानसिंहासनाधिश्वर श्रीश्रीश्री १००८ जगद्गुरु डॉ. चंद्रशेखर शिवाचार्य महास्वामीजी यांच्या पावन उपस्थितीत भव्य धर्मसभा, दर्शन सोहळा व महाप्रसादाचे आयोजन बारामती नगरीत करण्यात आले आहे.
हा धार्मिक व आध्यात्मिक सोहळा सोमवार दिनांक ८ जून रोजी संपन्न होणार आहे. सकाळी ८ वा.महास्वामींच्या स्वागतासाठी भव्य शोभायात्रा व ग्रंथ दिंडीचे आयोजन करण्यात येणार आहे. शोभायात्रेनंतर महास्वामीजीचे इष्टलिंग पूजन, दाम्पत्य पूजा, तीर्थ, धर्मसभा आशीर्वचन, दर्शन सोहळा व महाप्रसादाचा कार्यक्रम येथील वीरशैव मंगल कार्यालय, भिगवणरोड बारामती येथे संपन्न होणार आहे. यावेळी 'मार्ग हा मुक्तीचा' या ग्रंथाचे प्रकाशन व धर्मोपदेश काशी महास्वामीजींच्या अमृत वाणीने होणार आहे.
या संपूर्ण अधिकमासाचे नेतृत्व श्री. ष. ब्र. १०८ श्री सद्गुरु सदाशिव शिवाचार्य महाराज, बहन मठ संस्थान वेळापूर यांनी केले आहे. संपूर्ण महाराष्ट्रात प्रमुख गोवोगावी काशी महास्वामीजींचे इष्टलिंग पूजन व ग्रंथ दिंडीचे आयोजन संपूर्ण अधिकमसानिमित्त केले आहे.
या कार्यक्रमासाठी काशी महास्वामीजींचे रविवार दिनांक ७ जून २०२६ रोजी बारामती नगरीत आगमन होणार आहे. सदर कार्यकमामुळे बारामती पंचक्रोशीतील वीरशैव लिंगायत समाजात भक्तिमय वातावरण निर्माण झाले आहे. भाविंकामध्ये मोठी उत्सुकता पहायला मिळत आहे. धार्मिक परंपरा, संस्कृती व आध्यात्मिक विचारांचा प्रसार करण्यासाठी हा सोहळा महत्वपूर्ण ठरणार आहे. तरी बारामतीतील पंचक्रोशीतील सर्व सद्भक्तांनी या पवित्र आध्यात्मिक सोहळ्याचा लाभ घ्यावा. अशी माहिती कार्यक्रमाचे नियोजनकर्ते श्री. ष. ब्र. १०८ शिवानंद शिवाचार्य वाळेवेकर महाराज, वीरशैव लिंगायत समाज ट्रस्ट व समस्त वीरशैव लिंगायत समाज बारामती यांनी दिली.
No comments:
Post a Comment