शेतकऱ्यांच्या हितासाठी कायमस्वरूपी कटिबद्ध : रवींद्र हितनली
शेतकऱ्यांना पीक व कर्ज साठी मार्गदर्शन मेळावा संपन्न
बारामती:- शेतकऱ्यांनी अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करावा व उत्तम आणि उत्कृष्ट शेती करीत शेती व्यवसाय मध्ये प्रगती करावी म्हणून विविध शेती कर्ज देऊन शेतकऱ्यांना आर्थिक स्वालंबन करू व शेतकऱ्यांच्या हितासाठी कायमस्वरूपी कटिबद्ध असल्याचे प्रतिपादन स्टेट बँक ऑफ इंडिया चे महाप्रबंधक रवींद्र हितनल यांनी केले
सोमवार दि.२२जून रोजी बारामती येथे स्टेट बँक ऑफ इंडिया च्या वतीने पुणे जिल्यातील शेतकऱ्यां साठी 'स्मार्ट ऍग्री मिट २०२६' चे आयोजन करण्यात आले होते
या प्रसंगी रवींद्र हितनल यांनी मार्गदर्शन केले.
या प्रसंगी उप महाप्रबंधक वीरेंद्र, संजीव कुमार, प्रादेशिक व्यवस्थापक राजू किशोरी गुप्ता, आय. सी. ए .आर. माळेगाव या संस्थेचे संचालक के .स्वामी. रेड्डी ,बारामती शाखा व्यवस्थापक आदित्य गोगटे व अधिकारी आणि शेतकरी उपस्तीत होते.
शेतकऱ्यां साठी कमी व्याज दरात कर्ज उपलब्ध असून शेतकऱ्यांनी त्याचा फायदा घ्यावा असेही आव्हान अधिकाऱ्यांनी केले.
मशरूम शेती व्यवसायात कमी एकरात जास्त उत्पादन घेऊन,अनेकांना रोजगार प्राप्त करून दिल्याबद्दल सोमेश्वर चे आर. एन. शिंदे यांचा सन्मान करण्यात आला. तसेच प्रतिकूल परिस्थितीत विविध फळे, भाजीपाला या मध्ये उत्कृष्ट पीक घेणाऱ्या व दुध, कुक्कुटपालन क्षेत्रात उत्कृष्ट कार्य करणाऱ्या शेतकऱ्यांचा ही सन्मान करण्यात आला.
खोमणे ऍग्रो फार्मर प्रोड्युसर कंपनी व आविष्कार पोल्ट्री फार्मस यांना शेतीसाठी कर्ज प्रकरण चा धनादेश मान्यवरांच्या हस्ते देण्यात आला.
शेतकऱ्यांनी सुद्धा मनोगत व्यक्त करून बँकेच्या सेवेबद्दल समाधान व्यक्त केले
सूत्रसंचालन श्री सावळेपाटील यांनी केले तर आभार प्रादेशिक व्यवस्थापक राजीव किशोरी गुप्ता यांनी मांनले
No comments:
Post a Comment